Holi of Agriculture Bills from Farmers Associations in Kolhapur
Holi of Agriculture Bills from Farmers Associations in Kolhapur 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी विधेयकांची होळी

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी (ता.२५) येथे विविध शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी त्यांच्या घरासमोर कृषी विधेयकाची होळी केली. तसेच सरकारने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. शेतकरी संघटना समन्वय समिती, किसान सभेचे अध्यक्ष डॉ. उदय नारकर, कॉ. नामदेव गावडे, ऊसतोडणी संघटनेचे प्रा. सुभाष जाधव, ‘शेकाप’चे बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, बाबुराव कदम, आम आदमीचे संदीप देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश भोजकर आदींच्या नेतृत्वाखाली शहरात शेती विधेयकांची होळी करण्यात आली.

स्वतः शेट्टी यांनी अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील आपल्या घरासमोर विधेयकाच्या प्रतीची होळी केली. ‘कृषी विधेयक मागे घ्या’, ‘केंद्र शासनाने केंद्र शासनाचा अधिकार असो’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. शेट्टी हे नुकतेच करोनामुक्त झाले असल्याने त्यांनी बाहेर जाण्याचे टाळून घरासमोरच होळी करत केंद्र शासनाच्या विरोधातील संताप व्यक्त केला.

मोदी सरकारच्या या विधेयकामुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. केंद्र शासनाला शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल, तर आधी कृषी उत्पादनांना हमीभावाची खात्री द्यावी. त्या संदर्भातील कायदा मंजूर करावा, असे विधेयक मी २००८ साली संसदेमध्ये मांडले होते. ते मंजूर केले, तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, अन्यथा शेतकरी हिताच्या नावावर कार्पोरेट कंपन्यांचे भले होणार आहे, या विधेयकाच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन सुरू राहील, असा इशारा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT