वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत : पंतप्रधान
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत : पंतप्रधान 
मुख्य बातम्या

वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत : पंतप्रधान

वृत्तसेवा

नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा अंत झाला. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन कायम आमच्यासोबत राहील. प्रत्येक भारतीयाला आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळत राहील. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्यासाठी देव त्यांना शक्ती देवो, ओम शांती", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी वाजपेयींच्या कवितेच्या माध्यमातून ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली. ''मी नि:शब्द आहे, शून्यात आहे. मात्र, भावनांचा ज्वर उमटत आहे. आमच्यासोबत अटलबिहारी वाजपेयी नाहीत. त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित केला होता. त्यांचे निधन म्हणजे एका युगाचा अंत आहे'', असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.    

मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है। हम सभी के श्रद्धेय अटल जी हमारे बीच नहीं रहे। अपने जीवन का प्रत्येक पल उन्होंने राष्ट्र को समर्पित कर दिया था। उनका जाना, एक युग का अंत है।

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT