karvanda_web_1
karvanda_web_1 
मुख्य बातम्या

करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... !!

सकाळ वृत्तसेवा

तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांत बहरली असून, अजून पंधरा ते वीस दिवसात रानमेवाही तयार होऊ पाहत असल्याने आगामी काही दिवसात याचा आस्वाद घेता येणार आहे.  वसंत आणि ग्रीष्मातील दाहकतेची पाहताचक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट, आंबट गोड, रसाळ रानमेवा... जिभेवर ठेवताच तासनतास त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण उन्हाळ्यात होतेच होते. विलायती चिंच,आवळा,बोरे,कैरी आदी चवही काही न्यारीच... उन्हाळा सुरु झाल्याने जिभेवर चोचले पुरविणारा काही ठिकाणी दुर्मिळ होत चलाला असताना देखील बागलाणच्या पश्चिम पट्यात काही आदिवसी भागात बहरला आहे.  

चैत्र महिना सुरु झाल्यानंतर प्रथम दर्शन होते. ते आंबट-गोड चवीच्या करवंदांचे.डोंगराच्या खुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. या वृक्षाला पांढऱ्या रंगाची फुले येतात. फुलांची गळती झाल्यावार हिरव्या रंगाचे करवंद बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग कला होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर उठून करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करतात.व आजूबाजूच्या खेड्या पाड्यात तसेच तालुक्याच्या ठिकाणी विक्रीसाठी नेली जतात.

डोंगराची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांचा गोडवा वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे.अशा गर्मीत मनाला गारवा देणारी करवंद खायची संधी मिळते. डोंगररांगेत मोठ्या प्रमाणातकरवंदांच्या जाळ्या पहायला मिळतात. थंडगार असलेली करवंद खायला मस्त असून ती खाल्ल्यानंतर मनाला गारवा मिळतो. 

करवंद हे बेरी वर्गीय फळा असून, त्याचा आरोग्य राखण्यासाठीही उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोगप्रतिबंधांचे काम करतात. करवंद हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ टिकत नाही, मात्र कच्च्या करवंदांचे लोणचे व पिकलेल्या करवंदांचा मुरब्बा केला तर मात्र जास्त दिवस टिकतो.

करवंदांच्या झाडांना प्रचंड प्रमाणात काटे असतात अशामध्ये कष्टपूर्वक काढलेल्या करवंदाना बाजारात कमी भाव मिळतो.शहरात व ग्रामीण भागात उन्हाळी रानमेव्या व्यतिरिक्त करवंदाची चव काही औरच असते. आदिवसी भागात होणारी झाडांची कत्तल,गावागावत वाढलेली बांधकामे डोंगराळ भागातील होणारी कामे डोंगरांना लागणाऱ्या आगी यासारख्या कारणामुळे रानमेव्याच्या झाडांची संख्या कमी होत असल्याने याही झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT