Heavy rains receded in Sindhudurg
Heavy rains receded in Sindhudurg 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. त्यानंतर आज (ता.४) पावसाचा जोर काहिसा ओसरला. मात्र, काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. निसर्ग चक्री वादळामुळे किरकोळ पडझडीचे प्रकार घडले. मात्र शेती, फळे, बागायतीचे फारसे नुकसान झाले नसल्याची स्थिती आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी भातपेरणीला सुरूवात केली आहे. 

सकाळपासून शेतकरी मळ्यांमध्ये जोत, पॉवर ट्रिलर नांगरणी करताना दिसत होते. गेले दोन, तीन दिवस चांगला पाऊस झाला. दरम्यान बुधवारी सकाळपासून वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरक्ष झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत सुसाट्याचे वारे आणि पाऊस सुरू होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. वादळाच्या शक्यतेने जिल्हयातील ६५ हुन अधिक नागरिकांचे स्थंलांतर केले होते. आठ ते दहा नागरिकांच्या घरावर वादळाने झाडे कोसळली. त्यामुळे सुमारे ३ लाखांहून अधिक नुकसान झाले. 

गुरूवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. वारा देखील थांबला आहे. पावसाच्या सरी काही भागात कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून भात पेरणीला सुरूवात केली. चांगला पाऊस आणि दोन दिवसांवर आलेला मृग, यामुळे बहुतांशी शेतकरी पहाटेपासूनच मळ्यामध्ये उतरल्याचे चित्र दिसत होते. मळ्यांमध्ये बैलांचे जोत, पावर ट्रीलर, पावर विडर, दिसून येते होते. गावागावांतील मळे शेतकऱ्यांनी गजबजलेले दिसत होते. दरम्यान सिंधुदुर्गात गुरूवारी सकाळपर्यंत ३९ मि.मी पावसाची नोंद झाली.  ...... 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

SCROLL FOR NEXT