Heavy rains in most parts of Aurangabad, Jalna and Parbhani 
मुख्य बातम्या

औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत दमदार पाऊस

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही जिल्ह्यातील सर्वच मंडळांत मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही जिल्ह्यातील सर्वच मंडळांत मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी, तर बहुतांश मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांत पावसाने हजेरी लावली.

औरंगाबाद तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. औरंगाबाद मंडळात ३२.८, उस्मानपुरा २७.८, भावसिंगपुरा २५.८, चिकलठाणा ३०, करमाड २२.८, लाडसावंगी ३८.५, हरसुल २५.५, चौका २७.८, डोणगाव २७.३, कन्नड २६.८, करंजखेडा २१, सुलतानपूर ३२.३, बाजार ३८.३, निल्लोड २२.८, अजिंठा ३७.८, सावलदबारा २५, फुलंब्री २५.३, आळंद २०.५, पिरबावडा २९.३, तर वडोदबाजारमध्ये २८ मिलिमीटर पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळांत पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्यापाठोपाठ जाफराबाद, जालना, मंठा तालुक्यात चांगला पाऊस झाला. वरुड मंडळात सर्वाधिक ९४ मिलिमीटर पाऊस झाला. भोकरदन मंडळात ४४.८, सिपोरा ४१.५, धावडा ३४.८, अनवा ३०.३, पिंपळगाव ५१, हसनाबाद ३४, राजूर ३७.३, केदारखेडा ३६.५, जाफराबाद ६३.८, माहोरा ४६.८, कुंभारझरी ५४.५, टेंभुर्णी ५४.८, वाघरुळ २६.३, नेर २८.५, शेवली २२.८, विरेगाव २२, शेळगाव २१.३, दाभाडी ३०.५, बावणे पांगरी २८.५, मंठा २६.८, तळणी २१.३, ढोकसाल २८.३, तर पांगरीत २४.८ मिलिमीटर पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यातील ३९ मंडळांत तुरळक, मध्यम पाऊस झाला. त्यापैकी दोन मंडळांत दमदार पाऊस झाला. झरी मंडळात २३ मिलिमीटर, तर जिंतूर ४५.८, सांगवी ४९.८, बामणी २२.५, आडगाव ३६.५, चारठाणा २४, पूरणा २२, ताडकळस २८.३, लिमला ३१, कांतेश्वर ३२.५, चुडावा २९.५, वालूर २९.८, तर चिकलठाणा मंडळात २८ मिलिमीटर पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

Agriculture Advisory: ढगाळ हवामान; किमान, कमाल तापमानात वाढ शक्य

Carbon Farming: कार्बन शेती : शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग

Sugarcane Workers: मजुरांचे तांडे परतीच्या वाटेवर; शिवार पुन्हा गजबजणार

Maharashtra Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाडा, कोकणला अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान

SCROLL FOR NEXT