Heavy rains in Khamgaon, Shegaon, Balapur and Telhara talukas
Heavy rains in Khamgaon, Shegaon, Balapur and Telhara talukas 
मुख्य बातम्या

खामगाव, शेगाव, बाळापूर, तेल्हारा तालुक्यांमध्ये मुसळधार 

टीम अॅग्रोवन

अकोला ः वऱ्हाडात गेल्या २४ तासांपासून पावसाने ठाण माडंले असून जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. या तालुक्यांमधील अनेक मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र नदी-नाल्यांना पूर वाहत आहेत. अनेक शेतांमधून पाणी वाहल्याने उगवलेली पिके खरडून गेल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. 

या भागात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने जोरदार पाऊस होत आहे. मंगळवारी (ता. १४) रात्री सुरू झालेला पाऊस बुधवारीही सरींवर सरी कोसळत होत्या. शेगाव तालुक्यातील जवळा मंडळात सर्वाधिक २०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी बिकट स्थिती तयार झाली आहे. खामगाव तालुक्यात अडगाव,पळशी बुद्रुक मंडळात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. बाळापूर तालुक्यात बाळापूर ११२, पारस ९९, व्याळा ८२ मिलीमीटर पाऊस पडला. 

तेल्हारा तालुक्यात रात्री १२ वाजेनंतर पाऊस सुरु झाला. बुधवारी सकाळीही जोरदार पाऊस झाला. या तालुक्यातील भांबेरी, मनब्दा, अटकळी, टाकळी, दापुरा निंबोळी, पंचगव्हाण, दहिगाव, खापरखेड, थार, नेर, वळगाव-रोठे, जस्तगाव, पाथर्डी, शेरी, माळेगाव, हिवरखेड यासह संपूर्ण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर वाहिले. शेतांमधून पाणी गेल्याने पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. निमकर्दा (ता. बाळापूर) येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला असून बुधवारी दिवसभर त्याचा शोध घेतल्या जात होता. 

अकोला-बुलडाणा जिल्ह्यातील पाऊस  अकोला जिल्हा - पणज ८९, तेल्हारा ५६, पंचगव्हाण ६१, बाळापूर ११२, पारस ९९, व्याळा ८२, वाडेगाव ५७, उरळ ५९, निंबा ८२, हातरुण ८२, बाभूळगाव ५७ 

बुलडाणा जिल्हा- कवठळ ६६.५, खामगाव ४६, लाखनवाडा ४८.८, आवार ४८.८, पळशी १०३.५, अडगाव १०९.५, पारखेड ४८, शेगाव ९१, माटरगाव ५२, जलंब १०५, मनसगाव ११२.८, जवळा २०२ मिलीमिटर 

अकोल्यात अतिवृष्टीचा इशारा  नागपूर हवामान विभागाने दिलेल्या संदेशानुसार जिल्ह्यात शुकवार (ता. १७) पर्यंत अतिवृष्टी, वारा, वादळ, वीज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याचा इशारा दिला आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्पाच्या एका गेट मधून २.५० घनमीटर प्रति सेकंद या प्रमाणे पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. पूर्णा नदीवर असलेल्या घुंगशी बॅरेज प्रकल्पाचे पाण्याची पातळी २५३.४० घनमीटर असून सद्यःस्थितीत २४.७५ घनमीटर प्रतिसेंकद या प्रमाणे पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीमध्ये होत आहे. संबधित अधिकारी/कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहत पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT