crop damage
crop damage  
मुख्य बातम्या

पावसाने पुन्हा दाणादाण

टीम अॅग्रोवन

पुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि वऱ्हाडातील काही भागांत शनिवारी (सायंकाळी) जोरदार पाऊस झाला. नदी, नाल्यांना पूर आल्याने पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. सोयाबीनला झाडावरच कोंब फुटले तर अनेक ठिकाणी कपाशी पीक पाण्याखाली गेले. द्राक्षबागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी ऊस आडवा झाला.   मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील १४ मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील बहुतांशी मंडळात पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे करपरा, दुधना, इंद्रायणी, पूर्णा नद्या तसेच ओढे, नाल्यांच्या पुराचे पाणी शेतातील पिकांमध्ये शिरले. त्यामुळे पिके आडवी झाली. पूर्णा नदीच्या पाण्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आदींसह भाजीपाला, फळे, पिकांची मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा भिजून-भिजून त्यांना झाडावरच अंकुर फुटले आहेत. हिंगोली जिल्ह्यात ओढे, नाल्याचे पाणी शिरल्यामुळे ७०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी सोयाबीन, बाजरी, मका पिकांना फटका बसला. पावसामुळे अनेक ठिकाणी शेताचे बांध ओलांडून पाणी वाहिले. तर काही ठिकाणी शेतातून माती वाहून गेली. सोंगणीला आलेले बाजरीचे पीक आडवे झाले. कपाशीचे बोंडे खराब होत असून द्राक्ष छाटण्या रखडल्या आहेत. नवीन कांदा लागवडीमध्ये पाणी साचून राहिल्याने रोपे खराब होत आहेत.   पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, बारामतीसह अनेक भागांत शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भाजीपाला पिकांना फटका बसला. तर, नगर जिल्ह्यातील नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव भागाला जोरदार पावसाने झोडपल्याने खरीप पिकांचे नुकसान केले. जिल्ह्यातील काही भागांत सध्या सोयाबीन सोंगणी सुरु आहे. शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाबीन पावसात भिजले. नद्यांचे पाणी शिवारात परभणी जिल्ह्यात करपरा, दुधना, इंद्रायणी, पूर्णा नद्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन, कपाशी, मका, हळद आणि तूर पिकाचे नुकसान झाले. भाजीपाला पिके आणि फळबागांना मोठा फटका बसला. सोयाबीनच्या शेंगा सतत भिजून त्यांना झाडावरच अंकुर फुटले. हिंगोली जिल्ह्यात ओढे, नाल्यांचे पाणी शेतात शिरल्यामुळे ७०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

SCROLL FOR NEXT