hawaman
hawaman 
मुख्य बातम्या

राज्यात वादळी पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन

पुणे: पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता.१६) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उन्हाचा वाढलेला चटकाही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुरूवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक, निफाड, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा येथे कमाल तापमान चाळीशीपार गेल्याने उन्ह अधिकच तापदायक ठरत आहे. तसेच पुणे, सांगली, सातारा, बुलडाणा येथेही उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. कमाल तापमानात झालेली वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.  मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे आजपासून (ता.१७) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस, तर कोकणात हलक्या पावसाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

गुरूवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.८, जळगाव ४३.४, धुळे ४२.२, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्‍वर ३१.७, मालेगाव ४२.२, नाशिक ४०.५, निफाड ४०.०, सांगली ३८.२, सातारा ३८.१, सोलापूर ४१.१, डहाणू ३५.५, सांताक्रूझ ३४.६, रत्नागिरी ३३.८, औरंगाबाद ४०.२, बीड ४१.६, परभणी ४१.९, अकोला ४३.४, अमरावती ४१.४, बुलडाणा ३९.८, ब्रह्मपुरी ४०.५, चंद्रपूर ४१.६, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.६, वाशीम ४२.२, वर्धा ४१.६. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT