कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

टीम अॅग्रोवन

पुणे : मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस सुरू आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपासूनच उत्तर कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाने जोर धरला होता. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडत होता. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस सुरू आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपासूनच उत्तर कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाने जोर धरला होता. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडत होता. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.        नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. ६) राजस्थान, पंजाब, हरियाणा राज्यांचा काही भाग वगळता देश व्यापला आहे. दोन दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ आहे. आज (ता. ९) देशाच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडत असून, कोयना धरण क्षेत्रातील पोफळी येथे सर्वाधिक ३०० मिलिमीटर, शिरगाव २५०, ताम्हीणी २३०, दावछी २२०, डुंगरवाडी २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पालघर जिल्ह्यातील वाडा येथे २३०, साताऱ्यातील महाबळेश्वर येथे २४० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : वाडा २३०, पेण १६०, माथेरान, धारावी, जव्हार, चिपळूण प्रत्येकी १५०, मोखेडा १४०, विक्रमगड १३०, कल्याण, कर्जत, भिंवडी, अंबरनाथ, ठाणे प्रत्येकी १२०, तलासरी ११०, रोहा, शहापूर, डहाणू, मुरबाड, उल्हासनगर प्रत्येकी १००, वैभवाडी, खेड, गुहागर, महाड प्रत्येकी ९०, तळा, मंडणगड, उरण, सुधागडपाली प्रत्येकी ८०, पोलादपूर, मुरूड, राजापूर, पनवेल, खालापूर, मानगाव प्रत्येकी ७०, वसई ६०, लांजा, संगमेश्वर प्रत्येकी ५०. मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २४०, इगतपुरी १७०, गगनबावडा १५०, हर्सुल १४०, त्रिंबकेश्वर १३०, जावळी, पेठ प्रत्येकी ११०, सुरगाणा, पाटण, घोडगाव, वेल्हे प्रत्येकी १००, सातारा ९०, आजरा, राधानगरी, अकोले प्रत्येकी ८०, नाशिक, शाहूवाडी, पन्हाळा प्रत्येकी ७०, तळोदा, जुन्नर, कोरेगाव, भोर प्रत्येकी ६०, चंदगड, अक्कलकुवा, पौड, खेड, पुणे शहर, वडगाव मावळ, वाई प्रत्येकी ५०, पारोळा ४०, दिंडोरी, कराड, कागल, पुरंदर, गडहिंग्लज, नवापूर प्रत्येकी ३०. मराठवाडा : फुलांब्री, सोयगाव प्रत्येकी २०, परभणी, माहूर, आष्टी, वसमत, मानवत, माजलगाव, अर्धापूर, भोकरदन, खुल्ताबाद, सेनगाव प्रत्येकी १०. विदर्भ :   भामरागड, मोहाडी, मुलचेरा, धानेरा, कोर्ची, एटापल्ली प्रत्येकी २०.  घाटमाथा : कोयना पोफळी ३००, शिरगाव २५०, ताम्हीणी २३०, दावछी २२०, डुंगरवाडी २००, खोपोली, लोणावळा प्रत्येकी १७०, भिरा, ठाकूरवाडी १५०, कोयना नवजा १२०, लोणावळा १००, वळवण ९०, शिरोटा ८०, भिवापुरी ७०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price Demand: साताऱ्यात ऊसदराचा तिढा चिघळला; पहिली उचल जाहीर करण्याची मागणी

Indian Agriculture Export: भारतीय शेतीमाल निर्यातीला वाढती संधी

Warana Sugar Factory: ‘वारणा’चा गळीत हंगाम सुरू; यंदा १३ लाख टन गाळपाचे लक्ष्य

Agniveer Recruitment: २८२ नौदल अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँकेच्या १५ जागा बिनविरोध; सहा जागासाठी निवडणूक

SCROLL FOR NEXT