कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता 
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता  
मुख्य बातम्या

कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण व विदर्भात जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शिडकावा होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

मॉन्सून उत्तरेकडे गेल्याने राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडला. त्यानंतर कोकण, मराठवाडा व विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होऊन कमी-अधिक पाऊस पडत आहे. सध्या खानदेश, मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भाग, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत अजूनही पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. अनेक भागांत पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने सकाळपासून उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील अकोला येथे ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या भाग आणि मध्य अरबी समुद्र ते कोकण किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई या भागांत आज आणि उद्या या दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातही अतिवृष्टीचा होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भातही आज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असून, मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस  बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ  गुरुवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ  शुक्रवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ  शनिवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ  मंगळवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३३.६ 
  • अलिबाग - ३४.१ 
  • रत्नागिरी - २८.४ 
  • डहाणू - ३३.६ 
  • पुणे - ३२.४ 
  • कोल्हापूर - २९.८ 
  • महाबळेश्‍वर - २३ 
  • नाशिक - ३१.७ 
  • सांगली - ३०.३ 
  • सातारा - ३० 
  • सोलापूर - ३२.४ 
  • औरंगाबाद - ३३.६ 
  • बीड - ३५.५ 
  • अकोला - ३७.२ 
  • अमरावती - ३५ 
  • बुलडाणा - ३६ 
  • ब्रह्मपुरी - ३५.४ 
  • चंद्रपूर - ३२.६ 
  • गोंदिया - ३४.५ 
  • नागपूर - ३६.८ 
  • वर्धा - ३५.५ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

    Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

    Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

    Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

    Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

    SCROLL FOR NEXT