hawaman
hawaman 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव, सांगली, बीड, अकोला येथे तापमान चाळीशी पार गेले आहे. शनिवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ४१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान असल्याने मराठवाड्यात वादळी पावसाचा, तर विदर्भ, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उन्हाचा चटकाही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्यावर गेले आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा वाढून उकाड्यातही वाढ होत आहे. विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर उत्तर महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे आज (ता.५) मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा, तर कोकण, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.३, जळगाव ३९.६, कोल्हापूर ३८.७, महाबळेश्‍वर ३२.६, मालेगाव ४०.६, नाशिक ३७.७, निफाड ३७.०, सांगली ४०.०, सातारा ३९.१, सोलापूर ४१.०, डहाणू ३४.१, सांताक्रूझ ३४.१, रत्नागिरी ३४.१, औरंगाबाद ३८.४, बीड ४०, परभणी ३९.५, अकोला ४०.८, अमरावती ३८.८, बुलडाणा ३६.६, ब्रह्मपूरी ३९.०, गोंदिया ३७.६, नागपूर ३७.४, वर्धा ३७.९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT