Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

पूर्व विदर्भात मुसळधार शक्य 

टीम अॅग्रोवन

पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मराठवाडा, विदर्भात दोन दिवसांपासून उघडीप दिली आहे. मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भाग व खानदेशातही अंशतः ढगाळ वातावरण आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. मंगळवारी (ता.२२) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूर येथे ३६.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पावसामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. विदर्भात कमाल तापमानात ३० ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ३२ ते ३४ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात तापमान १९ ते ३४ अंश सेल्सिअस, तर कोकणात ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पुणे परिसरातही तापमानात काही अंशी घट झाली असून अंशतः ढगाळ वातावरण आहे.  मॉन्सूनचा प्रवास मंदावला  गेल्या दोन दिवसांपासून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) प्रवास उत्तर भारतात मंदावला आहे. मंगळवारी मॉन्सूनच्या प्रवासात फारशी प्रगती झाली नसल्याचे मॉन्सून जैसे थे आहे. त्यातच पुढे सरकण्यासाठी पुरेसे पोषक हवामान नसल्याने पुढील प्रवास संथगतीने सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरणीय स्थिती नसल्याने मॉन्सूनचा पुढची वाटचाल अडखळली आहे.  या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस  बुधवार ः भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया  गुरुवार ः भंडारा,नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया  मंगळवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३३.४ 
  • अलिबाग - ३२.८ 
  • रत्नागिरी - ३१.५ 
  • डहाणू - ३३.५ 
  • पुणे - २९.८ 
  • कोल्हापूर - २९.७ 
  • महाबळेश्वर - १९.९ 
  • मालेगाव -- ३३.२ 
  • नाशिक - २९.५ 
  • सांगली - ३०.९ 
  • सातारा - २८.१ 
  • सोलापूर - ३४.८ 
  • औरंगाबाद - ३२.४ 
  • परभणी -- ३४.७ 
  • बीड -- ३३.२ 
  • अकोला - ३५.९ 
  • अमरावती - ३४.० 
  • बुलडाणा - ३०.४ 
  • ब्रम्हपुरी - ३५.७ 
  • चंद्रपूर - ३६.२ 
  • गोंदिया - ३४.८ 
  • नागपूर - ३६.० 
  • वर्धा - ३६.०   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

    Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

    Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

    Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

    SCROLL FOR NEXT