Heatwave.
Heatwave. 
मुख्य बातम्या

उन्हाचा चटका, उकाडा वाढणार; अकोला ४४.८ अंशांवर

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. आजपासून (ता.२०) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहणार आहे. तर उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ होणार आहे. विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येत आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरीत भागातही उन्हाचा चटका वाढणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तापमान चाळीशी पार असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निवळल्याने आजपासून (ता. २०) राज्याच्या बहुतांशी भागात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.  मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२, धुळे ४२.०, जळगाव ४३.३, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्‍वर २८.९, मालेगाव ४०.०, नाशिक ३७.३, निफाड ३७.०, सांगली ३७.३, सातारा ३५.५, सोलापूर ४१.०, डहाणू ३४.६, सांताक्रूझ ३३.९, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद ४०.०, परभणी ४१.८, नांदेड ४०.५, अकोला ४४.८, अमरावती ४१.०, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४१.५, गोंदिया ४१.६, नागपूर ४३.०, वर्धा ४२.८. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT