कापूस क्षेत्र १५ लाख हेक्‍टरने रोडावण्याचे संकेत
कापूस क्षेत्र १५ लाख हेक्‍टरने रोडावण्याचे संकेत 
मुख्य बातम्या

यंदा उन्हाचा ताप गतवर्षीपेक्षा कमी

टीम अॅग्रोवन

पुणे : देशातील पूर्व आणि दक्षिण राज्ये वगळता उर्वरित भागात यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्याचा हंगाम थंड असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह मुख्यत: उष्ण असलेल्या उपविभागात यंदा सर्वसाधारण उष्णतेच्या लाटा येतील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  मॉन्सून मिशल कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीम माॅडेलच्या साह्याने हवामान विभागातर्फे उन्हाळा आणि थंडीचे पूर्वानुमान देण्यात येते. हवामान विभागाने २८ फेब्रुवारी रोजी पूर्वमोसमी हंगामाचा (मार्च, एप्रिल, मे) अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार पूर्वमोसमी हंगामात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी (ता. १) देशातील उन्हाळा हंगामाचे (एप्रिल, मे, जून) उपविभागनिहाय पूर्वानुमान जाहीर केले.  कमाल तापमान जम्मू काश्‍मीर, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेशमध्ये एप्रिल ते जून महिन्यांमध्ये दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक अंशाने अधिक राहणार आहे, तर उत्तराखंड, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पूर्व आणि पश्‍चिम राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ ते १ अंशाने अधिक आणि उर्वरित सर्वच उपविभागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ०.५ कमी किंवा अधिक असण्याची शक्यता आहे.  किमान तापमान पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पश्‍चिम-उत्तर प्रदेश, पूर्व आणि पश्‍चिम राजस्थामध्ये रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा एक अंशाने अधिक राहील. जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार झारंखड, पूर्व-पश्‍चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरातमध्ये किमान ०.५ अंश ते १ अंशाने अधिक असेल. उर्वरित उपविभागांत कमान तापमान ०.५ अंशापेक्षा कमी असेल.  सर्वसाधारण उष्णतेच्या लाटा उन्हाळ्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येणाऱ्या विभागांमध्ये (हीट वेव कोअर झोन) यंदा उष्णतेच्या सवसाधारण लाटा येण्याची शक्यता आहे. यात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशाचा किनारा या भागांचा समावेश आहे.   ‘ला-निना’चा प्रभाव जूनअखेरपर्यंत? विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाची स्थिती विचारात घेता, या भागात सध्या ला-निना स्थितीचा प्रभाव कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे; मात्र वातावरणातील स्थितीवरून ‘ला-निना’ असल्याचे स्पष्ट होत नाही; मात्र माॅन्सून मिशन कपल्ड माॅडेलनुसार किमान जूनअखेरपर्यंत ‘ला-निना’ स्थिती कायम राहणार आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT