The heat wave will increase in the state 
मुख्य बातम्या

राज्यात उन्हाचा चटका वाढणार

पुणे : राज्यात वादळी पाऊस सूरू असतानाच आता उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. विदर्भात उन्हाची ताप अधिक आहे. चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात वादळी पाऊस सूरू असतानाच आता उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. विदर्भात उन्हाची ताप अधिक आहे. चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजपासून (ता. १३) कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शुक्रवारी (ता. ११) सकाळी सातारा, सोलापूरसह दक्षिणेकडील जिल्ह्यात हलक्या स्वरूपात हजेरी लावणाऱ्या पावसाने सायंकाळनंतर उत्तरेकडील जिल्ह्याकडे मोर्चा वळविला. नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. 

बिहार आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर कर्नाटकपासून छत्तीसगडपर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १३) राज्यात दक्षिण भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस सुरू असतानाच विदर्भासह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या वर गेले आहे. शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३८ अंश, तर जळगाव, अकोला येथे ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये  राज्यात विविध ठिकाणी नोंदले 

गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३४.१,  नगर ३६.८, धुळे ३५.०, जळगाव ३७.१, कोल्हापूर ३४.१, महाबळेश्वर २७.४, मालेगाव ३५.५, नाशिक ३३.३, निफाड २९.१, सांगली ३५.३, सातारा ३०.९, सोलापूर २८.०, सांताक्रूझ ३६.२, डहाणू ३२.०, रत्नागिरी ३५.९, औरंगाबाद ३४.६, नांदेड ३५.२, परभणी ३६.१, अकोला ३७.१, अमरावती ३६.८, बुलडाणा ३५.०, चंद्रपूर ३८.०, गडचिरोली ३६.४, गोंदिया ३५.०, नागपूर ३६.०, वर्धा ३६.५, वाशीम ३५.५, यवतमाळ ३६.५.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT