Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

ऊन वाढण्यास प्रारंभ 

टीम अॅग्रोवन

पुणे ः अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी (ता.१) विरून गेल्याने राज्यात पुन्हा कोरडे वातावरण झाले आहे. यामुळे थंडीत चढउतार होत असले, तरी सकाळपासून उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक भागांत काही ठिकाणी किंचित थंडी आहे. मंगळवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात ११.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मध्य महाराष्ट्रात चक्रीय स्थिती असल्याने काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने किमान तापमानासह कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. २) सकाळपासून उन्हाचा चटका वाढला होता. दुपारी कडक ऊन पडल्याने कमाल तापमानात वाढ झाली  आहे. सध्या राज्यात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात जवळपास चार ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भातील काही भागात तापमानात वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत चंद्रपूर येथे ३९.९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. तसेच किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीचा प्रभाव चांगलाच कमी झाल्याची स्थिती आहे. 

मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात थंडी कमी झाल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सांगली, कोल्हापूर भागांत सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. कोकणातही थंडी कमी होऊ लागल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. या भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढत असल्याने उकाडा वाढू लागला आहे. मराठवाड्यातही ऊन वाढत असल्याने किमान तापमानाचा पारा १७ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. विदर्भात थंडी कमी झाल्याने किमान तापमानाचा पारा कमी वेगाने वाढला आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा या भागांतील किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.  सोमवारी (ता. १) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) २०.६ (१) 
  • ठाणे २१ 
  • अलिबाग २१.७ (२) 
  • रत्नागिरी २४ (३) 
  • डहाणू २२.६ (३) 
  • पुणे १६ (२) 
  • जळगाव १३ (३) 
  • कोल्हापूर २३.७ (५) 
  • महाबळेश्वर १८.२ (२) 
  • मालेगाव १७.२ (३) 
  • नाशिक १५.५ (३) 
  • निफाड ११.५ 
  • सांगली २२.१ (५) 
  • सातारा २०.९ (४) 
  • सोलापूर २२.६ (२) 
  • औरंगाबाद २०.५ (४) 
  • बीड १९.३ (३) 
  • परभणी १९.६ (१) 
  • परभणी कृषी विद्यापीठ १७.२ 
  • नांदेड १७.५ (१) 
  • उस्मानाबाद १८.४ (१) 
  • अकोला १८.२ 
  • अमरावती २१.१ (२) 
  • बुलडाणा २२.४ (३) 
  • चंद्रपूर २०.२ (१) 
  • गोंदिया १७ (-१) 
  • नागपूर १७.३ 
  • वर्धा १९ (१) 
  • यवतमाळ २०.५ (१) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

    Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

    Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

    Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

    SCROLL FOR NEXT