गारपीठ, पावसाने कोट्यवधीचे नुकसान 
मुख्य बातम्या

खानदेशात गारपीठ, पावसाने कोट्यवधीचे नुकसान

टीम अॅग्रोवन

जळगाव :: खानदेशात मागील दोन दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने कांदा, चारा, घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. अमळनेरातील नुकसानीचा अंदाज आला असून, १६ लाखांचे नुकसान एकट्या अमळनेरात झाले आहे. तसेच जामनेर, धुळे, शिंदखेडा व नंदुरबार तालुक्‍यांतही नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी या पावसाचा दिलासा मिळाला आहे; परंतु वादळ व गारपिटीने पिकांसह पशुधनालाही फटका बसला. उघड्यावरील धान्य, चाऱ्याची नासाडी झाली. नंदुरबार भागात मिरची पिकाचे काहीसे नुकसान झाले. अमळनेर शिरुड, फापोरे, बिलखेडे व कन्हेरे शिवारातील ६२ घरांचे पत्रे उडाले, दोन शाळांचे छतही उडाले असून, ५० वृक्ष उन्मळून पडले आहेत. खानदेशात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. शिंदखेडा व अमळनेरातील काही गावांमध्ये तुरळक गारपीट झाली. शिंदखेडा भागात काही गावांमध्ये वीजतारा व लोखंडी खांबही तुटले आहेत. कोळपिंप्री (ता. पारोळा) येथेही  वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या तडाख्याने घरांचे मोठे नुकसान झाले.

अविनाश शाळा परिसरातही वृक्ष उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. धुळे तालुक्‍यातील कापडणे, सरवड, सोनगीर, धनूर, सायने, धमाणे, आर्वी, सडगाव, उडाणे, गोताणे, मोरशेवडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीस आलेला कांदा, भाजीपाला, बोर उत्पादकांचे नुकसान झाले आहे. साठविलेल्या चाऱ्याचेही नुकसान झाले. वादळी वाऱ्यापेक्षा अधिक तासभर पाऊस झाला असता, तर रब्बीसाठी उपयुक्त ठरला असता, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. जामनेर तालुक्‍यात औरंगाबाद जिल्ह्यालगच्या गावांमधील रब्बी पिकांचे किरकोळ नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Avliya Avinash Success Story: विनाशकारी कोविड : अवलिया अविनाश

Tomato Bacterial Wilt: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगावर काय उपाय करावा?

Choose Right Tree: कोणता वृक्ष आणि कुठे लावावा?

Biological Crop Disease Control: केवडा रोग कार्यरत होण्यास वाव, जैविक नियंत्रणावर हवा भर

Weather Stations: स्वयंचलित हवामान केंद्रांशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई : मित्तल

SCROLL FOR NEXT