काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी करा ः डॉ. बोंडे
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी करा ः डॉ. बोंडे 
मुख्य बातम्या

काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी करा ः डॉ. बोंडे

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीच्या खरेदीसाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. त्याकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनसह प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा चालविला आहे.  अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, वरुड, मोर्शी या तालुक्‍यांमध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या वर्षी मात्र संततधार तसेच अवकाळी पावसाचा ज्वारी उत्पादकांना चांगलाच फटका बसला. ज्वारी काळवंडल्याने त्याच्या विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून या भागात ज्वारी खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, एफएक्यू दर्जाची नसल्याचे सांगितले जात काळ्या ज्वारीच्या खरेदीस नकार दिला जात आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ज्वारीचा हमीभाव २५०० रुपये असताना व्यापाऱ्यांकडून १ हजार रुपये दरानेच काळी पडलेली ज्वारी खरेदी केली जात आहे. ज्वारीच्या उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील यामुळे शक्‍य नसल्याने प्रशासनाने हस्तक्षेप करीत काळ्या पडलेल्या ज्वारीच्या अनुषंगाने वेगळे धोरण राबवीत वाढीव दर द्यावा, अशी मागणी डॉ. बोंडे यांची आहे. ज्वारीला अवघा एक हजार रुपये क्‍विंटलचा दर असल्याने शेतकऱ्यांचे १ हजार ते १५०० रुपयांचे नुकसान होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT