गवार
गवार 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात गवार दहा किलोस २५० ते ४५० रुपये

Raj Chougule

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, गवारीस समाधानकरक दर मिळाला. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते २२० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. गवारीची दररोज तीस ते चाळीस पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस २५० ते ४५० रुपये दर होता.  गेल्या पंधरवड्यापासून बाजार समितीत दराबाबतचे मंदीचे वातावरण याही सप्ताहात कायमच होते. टोमॅटोची दररोज एक ते दीड हजार कॅरेटची आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस २० ते १०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक नियमित असली, तरी एखाद्या दिवशीच दरात थोडी वाढ होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यापासून टोमॅटो, फ्लॉवरला दर नसल्याने शेतकऱ्यांनी हा भाजीपाला अक्षरश: काढून टाकला आहे. यामुळे आवकेतही सातत्य नाही. येत्या महिन्याभरात याचा उलट परिणाम दिसून येणे शक्‍य असल्याचेही बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  कोल्हापूर शहराजवळील गावांतून काकडीची दररोज शंभर ते दीडशे करंड्या आवक झाली. काकडीस दहा किलोस ५० ते २२० रुपये दर होता. फ्लॉवरची साडेतीनशे ते चारशे पोती आवक होती. फ्लॉवरच्या दरात किंचित सुधारणा दिसून आली. फ्लॉवरला दहा किलोस ५० ते २२० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगेची ९० ते १०० पोती आवक होती. शेवगा शेंगेस दहा किलोस १५० ते २०० रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची अठरा हजार पेंढ्यांची आवक झाली. मेथीच्या आवकेत घट होती. मेथीची दररोज चार ते पाच हजार पेंढ्यांची आवक होती. मेथीस शेकडा ५०० ते १००० रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT