Green Heavy rains in Sindhudurg district
Green Heavy rains in Sindhudurg district 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी (ता. ६) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. वैभववाडी, कणकवली तालुक्यांच्या पूर्वपट्ट्याला तर पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. या पावसामुळे भातकापणीला ब्रेक लागला आहे. नाचणीची काढणीदेखील रखडली आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यातील भातपिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी उशिरा सतत पाऊस पडत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उत्तरेकडून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस वैभववाडी, कणकवली तालुक्याच्या काही भागांत पोहोचला. पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. सह्याद्री पट्ट्यात तर मुसळधार पाऊस झाला. या शिवाय जिल्ह्याच्या अन्य भागात देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

पावसामुळे अंतिम टप्प्यातील भातकापणी रखडली आहे. सकाळच्या सत्रात काही अंशी कापणी केली जाते. परंतु पावसाचा भरवसा नसल्यामुळे शेतकरी दुपारपर्यंत भातकापणी करून त्याची आवराआवर करीत आहेत. पावसामुळे काही भागात भातपिकाचे नुकसान देखील झाले. भातपिकांसह नाचणी पिकाची काढणी देखील रखडली आहे.

या शिवाय काजू पिकावरील फवारण्या रखडल्या आहेत. काजूला सध्या पालवी आणि काही ठिकाणी मोहोर येण्याची प्रकिया सुरू झाली आहे. त्यामुळे काही बागायतदारांनी या पूर्वीच कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या. परंतु त्यानंतर पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे आता बागायतदारांना पुन्हा फवारण्या घ्यावा लागणार आहेत. परंतु पाऊस थांबत नाही, तोपर्यंत फवारण्या घेता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT