grapes
grapes 
मुख्य बातम्या

पुणे जिल्हयात द्राक्षाचे १०० कोटींचे नुकसान 

टीम अॅग्रोवन

पुणे ः लॉकडाऊनमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. कमी मागणीमुळे गेल्या एक ते सव्वा महिन्यात द्राक्ष उत्पादकांना अत्यंत कमी दरात विक्री करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रति किलोमागे साधारणपणे ४० ते ५० रूपयापर्यंत नुकसान झाले असून सुमारे १०० कोटींचा फटका बसल्याचे चित्र आहे.  पुणे जिल्ह्यात द्राक्षाचे सुमारे पाच ते सहा हजार एकर क्षेत्र आहे. यामध्ये जुन्नर आणि आंबेगाव ही तालुके अग्रेसर आहे. याशिवाय इंदापूर, बारामती, दौमड आणि शिरूर तालुक्यातही द्राक्ष उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. द्राक्ष उत्पादकांनी उत्पादित केलेल्या द्राक्षाला परदेशासह, स्थानिक बाजारपेठेतही मोठी मागणी होती. यंदा साधारपणपणे दहा ऑक्टोबर ते २० मार्चपर्यमत द्राक्षाचा हंगाम सुरळीत सुरू होता.  परंतु, त्यानंतर करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन केल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या विक्रीक्षम बागांवर परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, इंदापूर, दौंड आणि बारामती या भागातील सुमारे दोन ते तीन हजार एकर बागेतील द्राक्षांची बांगलादेश, श्रीलंका, रशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, इंग्लड अशा विविध देशात निर्यात केली जात होती. शेतकऱ्यांना एकरी सरासरी ८ ते १२ टन उत्पादन मिळते. या द्राक्षांना प्रतवारीनुसार सरासरी  १२० ते १३० रुपये दर मिळत होता. तर स्थानिक बाजारात ८० ते १२० रूपये दर मिळत होता.  मात्र, लॉकडाऊन आणि अवकाळी पाऊस यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचा बाजार थंडावला आहे. सध्या द्राक्षाची प्रति किलो ३० ते ४० रूपये दराने विक्री करण्याची वेळ आली असून प्रति किलोस ४० ते ५० रूपयांचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. या शेतकऱ्यांचे साधारणपणे १०० कोटीचे नुकसान झाले आहे.  मनुक्याच्या दराची शाश्वती नाही  पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या विक्रीअभावी मनुक्याच्या निर्मितीवर भर देण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, या मनुक्याला बाजारात प्रत्यक्षात किती दर मिळेल याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT