Grape exports from Sangli slow
Grape exports from Sangli slow 
मुख्य बातम्या

सांगलीतून द्राक्ष निर्यात संथ

टीम अॅग्रोवन

सांगली ः यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून युरोपसह आखाती देशात ३३६० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षात गोडी उतरत नाही. याचा परिणाम निर्यातीवर होत असून, निर्यात संत गतीने सुरू आहे.  

यंदा नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर मात करत जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम उशिरा सुरू झाला. जिल्ह्यातून सातासुद्रपार द्राक्षही जाऊ लागली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाढती थंडी आणि धुके याचा परिणाम द्राक्षावर होऊ लागला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. वास्तविक पाहता, यामुळे द्राक्षात गोडी उतरत नाही. मण्यांची फुगवण अपेक्षित होत नाही. त्यामुळे यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून निर्यात संथ सुरू आहे. 

जिल्ह्यातून युरोपीय देशांत ६८ कंटनेर अर्थात ८६९ टन, तर आखाती देशासह रशिया, मलेशिया, सिंगापूरयासह अन्य देशांत १६६ कंटनेर म्हणजे २४९१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यंदा जिल्ह्यातील द्राक्षांना रशियातून मागणी वाढत असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. जानेवारीच्या शेवटच्या सप्ताहात १८२७ टन द्राक्ष निर्यात झाली होती. युरोपापेक्षा आखाती देश, अन्य देशांत द्राक्षाची निर्यात अधिक होत असल्याचे चित्र आहे.

पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्यातीस गती नाही. परंतु येत्या काळात निर्यात वाढेल, असा अंदाज आहे. यंदा रशियातून द्राक्षाला चांगली मागणी आहे.  -प्रकाश नागरगोजे,  कृषी अधिकारी (निर्यात) सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जरूर आणा, पण...

Animal Ear Tagging : मे अखेरपर्यंत करावी जनावरांची इअर टॅगिंग

Mahavitran Chatbot Service : ‘महावितरण’ची ग्राहकांसाठी २४ तास ‘चॅटबॉट’ सेवा

Tomato Cultivation : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात टोमॅटो लागवडीला वेग

Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

SCROLL FOR NEXT