संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कीटकनाशक हाताळणी प्रबोधनासाठी आता ग्रामसभा

Santosh Munde

औरंगाबाद  : कीटकनाशकांची हाताळणी व फवारणी करताना नेमकी कशी काळजी घ्यावी, यासाठी आता विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. १ नोव्हेंबरला प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा घेऊन प्रबोधन करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या विशेष ग्रामसंभांमधून शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व आदिवासी उपाययोजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी गावातील पात्र लाभधारकांच्या यादीस मान्यताही देण्याचे प्रत्येक तालुक्‍याच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशके फवारणी करताना झालेल्या विषबाधेच्या दुर्घटनेच्या पार्श्र्वभूमिवर औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना कीटकनाशके हाताळताना, फवारताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे.

१३ ऑक्‍टोबरला कृषी विभागातील सर्व अधिकारी, आरोग्य अधिकारी व सर्व कीटकनाशके बियाणे विक्रेते यांची एकदिवसीय कार्यशाळा औरंगाबादमध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विशेष ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांना, शेतमजुरांना याविषयी अधिकाधिक जागरूक करण्याचे सूचित केले होते. त्या सूचनेला अनुसरून आता १ नोव्हेंबरला प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन जनजागर करण्यात येणार आहे.

या जनजागरात कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीमुळे होणारे नुकसान व त्यावर आणावयाचे नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेविषयीही या ग्रामसभेतून मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. ग्रामसभांना निरीक्षक म्हणून शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सर्व विभागातील विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे.

पंचायत समितीमधील कृषी अधिकारी, वि. अ (कृषी), कृषी विभागाकडील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांनी या सभांमध्ये विषयाला अनुसरून मार्गदर्शन करणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT