पूर्वहंगामी कपाशीखालील क्षेत्र रिकामे करण्यात येत आहे. पऱ्हाटी उपटून ती एका ठिकाणी गोळा करून जाळली जात आहे
पूर्वहंगामी कपाशीखालील क्षेत्र रिकामे करण्यात येत आहे. पऱ्हाटी उपटून ती एका ठिकाणी गोळा करून जाळली जात आहे 
मुख्य बातम्या

कापसाखालील क्षेत्रात हरभरा, मका पेरणीचे नियोजन

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात यंदा पावसाची अनियमितता व रोगराई यामुळे बहुसंख्य क्षेत्रावरील पूर्वहंगामी कापसाला फटका बसला. आता या कापसाखालील क्षेत्र रिकामे करून त्यात हरभरा, मका पेरणीचे नियोजन शेतकरी करीत आहेत.  खानदेशात आठ लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली असून, त्यातील सव्वालाख हेक्‍टर क्षेत्र हे पूर्वहंगामी कपाशीखाली आहे. मे महिना व जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली होती. पण यंदा पावसाचे पाणी हवे तसे मिळाले नाही. गुलाबी बोंडअळीने जुलै महिन्यातच जेरीस आणले. अशातच हळूहळू पीक हातचे गेले. आजघडीला पूर्वहंगामी कपाशीचे पीक फारसे समाधानकारक नाही. ज्या शेतकऱ्यांनी भरमसाठ खर्च फवारणी व खतांवर केला त्यांचे पीक बरे दिसते. पण इतर क्षेत्रात पिकाची स्थिती चांगली नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर पीक काढायला मागील आठवड्यातच सुरवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी थेट कपाशीवर रोटाव्हेटर फिरविला असून, त्यात बैलांद्वारे मशागत करून हरभरा, मका, गहू पेरणीचे नियोजन त्यांनी केले आहे. चोपडा, जळगाव, शिरपूर, शहादा, यावल या भागांत कपाशीचे पीक काढायला सुरवात झाल्याची माहिती मिळाली.  १७ ते १८ हजार हेक्‍टर क्षेत्र रिकामे होणार खानदेशात जवळपास सव्वालाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कपाशी अाहे. यातील सुमारे १७ ते १८ हजार हेक्‍टर क्षेत्र आगामी चार ते पाच दिवसांत रिकामे केले जाईल. रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात बीटी कापसाखालील क्षेत्राचाच समावेश असणार आहे. देशी कपाशीचे पीक बरे असल्याने ते मोडले जाणार नसल्याचे चित्र आहे. 

कपाशी परवडलीच नाही मोठी मेहनत करून मे महिन्यात पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली. एक-एक बीजाचे अंकुरण व्हावे यासाठी भरउन्हात शेतकरी राबत होता. परंतु कपाशीचे हे पीक यंदा नुकसानकारक ठरले आहे. पूर्वमशागत, बियाणे, आंतरमशागत, सूक्ष्मसिंचन यंत्रणा, खते, वेचणी, फवारणी आदी खर्च व उत्पन्न यात ताळमेळ बसलेला नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT