दूध  
मुख्य बातम्या

गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपये वाढ

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. ही दरवाढ २१ मेपासून जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना लागू होणार आहे. या दरवाढीमुळे गाय दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २५ रुपये असा दर मिळेल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दिली. राज्यात गायीचे दूध अतिरिक्‍त झाल्यामुळे राज्यातील सर्वच दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली होती. जानेवारी महिन्यात गाय दूध दरात दोन रुपयांनी कपात करून २५ रुपये लिटर दुधाचा दर २३ रुपयांवर आला होता. यामुळे दूध उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात होती. गायीला जादा पशुखाद्य द्यावे लागते.  तसेच औषध-पाण्याचा खर्च जादा येतो. त्यामुळे गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपयांपेक्षा जास्त दर मिळावा, अशी मागणी गाय दूध उत्पादकांकडून होत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘अमूल’ने गाय दूध विक्री दरात वाढ केली आहे. ‘गोकुळ’नेही सावध पवित्रा घेत, गाय दूध विक्री दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या. आता खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे विक्री दरातही दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: निमखेडी येथे शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

Jaltara Project: बार्शीत ‘जलतारा प्रकल्प’ प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात

Shaktipeeth Highway Project: अंगावर गोळ्या झेलू, पण ‘शक्तिपीठ’ होऊ देणार नाही

Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT