गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन 
मुख्य बातम्या

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ स्वादूपिंडच्या कर्करोगाने आजारी असलेले देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज (ता.१७) संध्याकाळी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती कळताच ताळगाव येथील खासगी निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी धाव घेतली. यावेळी तेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटर ठेवण्यात आले होते. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने गोमेकॉ इस्पितळाच्या डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने यासंदर्भातची माहिती जवळच्या नातेवाईकांना देण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांनीही ताळगाव येथील निवासस्थानी धाव घेतली आहे. सरकारमधील मंत्री, आमदार तसेच भाजप नेत्यांनी निवासस्थानी पोचले. निवासस्थानच्या प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त ठेवून पर्रिकर यांच्या जवळच्या नातेवाईकांनाच कंपाऊंडमध्ये प्रवेश दिला जात होता. या ठिकाणी त्यांचे जवळचे नातेवाईक व कुटुंबातील सदस्य निवासस्थानी पोहचले होते. त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा रात्री उशिरापर्यंत करण्यात आली नव्हती मात्र राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.  भाजप आमदारांची काल तातडीची बैठकही झाली होती व सर्व आमदारांना गोव्याबाहेर न जाण्याची सूचना करण्यात आली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा आजार फेब्रुवारी 2018 मध्ये अधिक बळावल्याने त्यांना सुरुवातीला दिल्लीतील एम्स इस्पितळ व त्यानंतर उपचारासाठी अमेरिकेतही दाखल करण्यात आले होते. तेथून उपचार घेऊन ते गोव्यात परतले होते. 2018 मध्ये पावसाळी अधिवेशनात त्यांनी कामकाज हाताळले होते व त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्याना दिल्लीतील एम्स व त्यानंतर अमेरिकेत नेण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 14 ऑक्‍टोबर 2018 रोजी एम्स इस्पितळातून स्ट्रेचरवरून गोव्यात आणले होते. ताळगाव येथील निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. वारंवार प्रकृती बिघडल्यास त्यांना गोमेकॉ इस्पितळात  दाखल केले जात होते व त्यांच्या चाचण्याही केल्या जात होत्या. हल्लीच त्यांच्यावर दोनवेळा तपासणीच्या चाचण्या झाल्या होत्या. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्याने दिल्लीतील एम्सच्या डॉक्‍टरांनी उपचार केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT