drip irrigation
drip irrigation 
मुख्य बातम्या

ठिबकच्या नव्या दरपत्रकाला मान्यता द्या 

टीम अॅग्रोवन

पुणे: कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे धास्तावलेल्या ठिबक संच उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. सुधारित दरपत्रकाला मान्यता देण्याची मागणी देखील या कंपन्यांनी राज्याच्या कृषी खात्याकडे केली आहे. 

२०२०-२१ मधील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना काढण्याच्या कृषी आयुक्तालयाच्या निर्णयाचे राज्यातील ठिबक उद्योगाने स्वागत केले आहे. मात्र, सुक्ष्म सिंचन साहित्याकरीता सुधारित दर लागू करावे लागतील, असाही आग्रह धरला आहे. 

राज्यात २०१७ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू झाली. या योजनेत सहभागी होणाऱ्या कंपन्या दरवर्षी साहित्याचे दर कृषी आयुक्तालयाला सादर करतात. सिंचन साहित्य निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालाच्या किमती गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने वाढत आहेत. ही वाढ २५ टक्क्यांच्या पुढे गेली असून मनुष्यबळ व वाहतूक खर्च देखील वाढल्याने कंपन्यांना दरवाढ करणे अनिवार्य आहे, असे उद्योगाचे म्हणणे आहे. 

“सुक्ष्म सिंचन उत्पादक कंपन्यांना स्वतःचे दरपत्रक लागू करण्यास व त्यानुसार दर आकारणी करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे कंपन्यांना सुधारित दरपत्रक सादर करण्याची मान्यता द्यावी,” अशी लेखी मागणी ठिबक कंपन्यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

सुक्ष्म सिंचन संच निर्मिती उद्योगात ९५ टक्के कंपन्या या ‘एमएसएमइ’ गटातील म्हणजेच सुक्ष्म,लघू,मध्यम उद्योग करणाऱ्या आहेत. कोविड १९ ची स्थिती, त्यानंतर लॉकडाउनची बंधने यात कंपन्यांची मोठी हानी झाली आहे. त्यात पुन्हा कच्च्या मालाची दरवाढ ही कंपन्यांसमोरील संकटात भर घालणारी ठरत आहे. त्यामुळे सध्याच्या किमतीत सुक्ष्म सिंचनाची उत्पादने विकणे अशक्य आहे, अशी भूमिका इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाने देखील घेतली आहे. 

दरम्यान, पुण्यातील पीव्हीसी पाइप व्यापारी वर्गाच्या म्हणण्यानुसार, प्लॅस्टिक पाइप निर्मितीसाठी कच्च्या मालाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विकली जाणारी अवजारे व पीव्हीसी पाइपचे दर वाढले आहेत. ही दरवाढ ७०-८० टक्के असून पुढील काही महिने तरी त्यात घट होण्याची शक्यता नाही. इंधन दरवाढीसोबतच पॉलिमरच्या वाढलेल्या किमती आणि कमी पुरवठा यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. 

कोरोना स्थितीमुळे शेतमालाला भाव मिळत नसताना पीव्हीसी पाइप व शेती अवजारांच्या किमतीत होणारी वाढ शेतकऱ्यांना दुहेरी संकटात टाकणारी आहे. पुणे भागातील बाजारपेठेत सध्या पीव्हीसी तीन इंची पाइप ५०० रुपयांऐवजी ९५५ रुपये तर चार इंची पाइप ७२० ऐवजी १३७० रुपयांना विकला जात आहे. 

अशी झाली कच्च्या मालाची दरवाढ  पीव्हीसी :  ५२ टक्के  एचडीपीई :  २२ टक्के  एलएलडीपीई :  ३० टक्के  पीपी :  ५१ टक्के  स्टील :  ४३ टक्के  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT