Give the benefit of Gharkul scheme only to the needy: Taksale 
मुख्य बातम्या

घरकुल योजनेचा लाभ गरजूंनाच द्या ः टाकसाळे

परभणी ः ‘‘संबंधित कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण भागात खरोखर पात्र आणि गरजू लाभार्थी आहेत, त्यांना प्राधान्याने पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ द्यावा’’, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिले.

टीम अॅग्रोवन

परभणी ः ‘‘संबंधित कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण भागात खरोखर पात्र आणि गरजू लाभार्थी आहेत, त्यांना प्राधान्याने पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ द्यावा’’, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिले.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस डेटाबेसमधील प्राधान्य क्रम यादी तयार करण्यासाठी जिंतूर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत बुधवारी (ता.१२) ते बोलत होते. या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गट विकास अधिकारी विष्णू मोरे, सहाय्यक गट विकास अधिकारी लोखंडे, डीआरडीएचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंकुश पाठमासे, शाखा अभियंता एस. एस. वसेकर, विस्तार अधिकारी नारायण शिंदे, शिवराम ढोणे आदी उपस्थित होते. 

टाकसाळे म्हणाले, ‘‘ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी अनावश्यक वेळ न दवडता पुढील दोन दिवसांत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या पात्र - अपात्र याद्या तपासणी करून पूर्ण कराव्यात.’’ 

मागील वर्षी घरकुल योजनेत जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सर्व अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बद्दल टाकसाळे यांनी सगळ्यांचे कौतुक केले.

खांडेकर म्हणाल्या, ‘‘ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसेच तालुका स्तरावरील विस्तार अधिकारी, गट विकास अधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व ग्रामपंचायतींमधील प्राधान्यक्रम याद्या शासनाच्या निकषानुसार प्राप्त होतील, या बाबत दक्षता घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT