paddy  
मुख्य बातम्या

आजऱ्यातील १२० घनसाळ उत्पादकांना नव्याने ‘जीआय’ची मान्यता 

३५ गावांतील १२० घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना चेन्नई येथील भारत सरकारच्या जिओग्राफिकल इंडिकेशन (भौगोलिक उपदर्शन) कार्यालयाने मान्यता दिली आहे.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: आजरा तालुक्यातील घनसाळ भाताला पाच वर्षांपूर्वी जीआय (भौगोलिक उपदर्शन) मानांकन प्राप्त झाले. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून येथील ३५ गावांतील १२० घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना चेन्नई येथील भारत सरकारच्या जिओग्राफिकल इंडिकेशन (भौगोलिक उपदर्शन) कार्यालयाने मान्यता दिली आहे, अशी माहिती आजरा तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत यांनी दिली.

अनेकांची पसंती असलेल्या घनसाळ तांदळाला मागणी सातत्याने वाढत आहे. या भाताचे क्षेत्र वाढावे त्याचबरोबर चांगल्या दर्जाचा तांदूळ ग्राहकांना मिळावा यासाठी आजरा तालुका शेतकरी मंडळ गेल्या एक तपापासून प्रयत्न करीत आहे. या तांदळाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले जात आहे. 

मंडळाच्या मार्गदर्शनानुसार उत्पादित केलेला तांदूळ मंडळाकडून खरेदी केला जातो. प्रतवारीनुसार साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत दर दिला जातो. यंदा शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे उत्पादन करण्यासाठी शुद्ध बियाणे मंडळामार्फत पुरवले जाणार आहे. काळा जिरगा या देशी वाणांचे बियाणे मंडळाकडे उपलब्ध असून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी व बियाण्यांच्या मागणीसाठी मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी श्री. सावंत यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT