Fungi, orange fruit due to lack of nutrients 
मुख्य बातम्या

बुरशी, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे संत्रा फळगळ

बुरशीजन्य रोग, अन्न द्रव्याची कमतरता व वातावरणातील बदलांमुळे ही फळगळ होत असल्याचे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे) केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिनेश पैठणकर यांनी व्यक्त केले.

टीम अॅग्रोवन

अकोला : विदर्भात सध्या संत्रा आंबिया बहाराच्या अपरिपक्व फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. बुरशीजन्य रोग, अन्न द्रव्याची कमतरता व वातावरणातील बदलांमुळे ही फळगळ होत असल्याचे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे) केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिनेश पैठणकर यांनी व्यक्त केले.

रिलायन्स फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित ऑडिओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. विद्यापीठाचे वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. योगेश इंगळे हे सहभागी झाले होते. डॉ. पैठणकर म्हणाले की, तोडणी पूर्वीच्या फळगळीमुळे संत्र्याच्या सरासरी उत्पादनात किमान २० टक्यांनी घट येण्याची शक्यता आहे. अचानक झालेल्या या बदलासोबत अन्नद्रव्याची कमतरता व बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्र्याची फळगळ सुरू आहे.  संतुलित अन्नद्रव्याची मात्रा न दिल्यास सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ संभवते. अधिक पावसाने झाडांच्या मुळांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे सुद्धा फळगळ होत आहे.

डॉ. पैठणकर यांनी उपाययोजनांबाबत माहिती देताना झाडावर भरपूर पालवी राहावी म्हणून अन्नद्रव्याच्या शिफारशीनुसार वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास त्वरित पुरवठा करणे आणि संजीवके फवारणीविषयक सविस्तर सांगितले.

डॉ.योगेश इंगळे यांनी बुरशीजन्य फळगळ कशी ओळखायची व त्याप्रमाणे करावयांच्या व्यवस्थापनाबाबत सखोल माहिती दिली. रसशोषण करणारा पतंग व फळमाशी यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण बाबींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे यांनी केले. कार्यक्रम सहाय्यक सुमित मातीकाळे यांनी सहकार्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT