Funeral in Paturda village on Shaheed Chandrakant Bhakre
Funeral in Paturda village on Shaheed Chandrakant Bhakre 
मुख्य बातम्या

शहीद चंद्रकांत भाकरे यांच्यावर पातुर्डात अखेरची मानवंदना

टीम अॅग्रोवन

पातुर्डा, जि. बुलडाणा ः श्रीनगर जवळील बारामुल्ला सेक्टरमधील सोपोरा येथे शनिवारी (ता. १८) अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. यात येथील जवान चंद्रकांत भाकरे यांचा समावेश होता. सोमवारी (ता. २०) सकाळी शोकाकूल वातावरणात पातुर्डा येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. 

यावेळी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ, माजीमंत्री आमदार डॉ. संजय कुटे, यांच्यासह इतर उपस्थित होते. 

चंद्रकांत भाकरे हे सन २००४ मध्ये सीआरपीएफमध्ये रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी ते सुट्टीवर गावी आले होते. हेड कॉन्स्टेबल या पदावर त्यांना पदोन्नती मिळाली होती. काही दिवसांतच ते प्रशिक्षणाला जाणार होते. परंतु ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांना तिथेच थांबविण्यात आले. सोपोरा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात चंद्रकांत भाकरे शहीद झाले. 

चंद्रकांत यांच्यामागे आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा मोठा परिवार आहे. भाकरे यांचा शेती हा मूळ व्यावसाय असून परिवाराकडे ४ एकर शेती आहे. दोघे भाऊ शेती करतात. चंद्रकांत यांचे पार्थिव श्रीनगरमार्गे विशेष विमानाने दिल्ली व तेथून नागपूरला आणण्यात आले. तेथून रात्री शेगावला पार्थिव पोचले. सोमवारी सकाळी ७ वाजता त्यांचे पार्थिव पातुर्डा गावात नेण्यात आले. 

शहीद जवानाच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी आपापल्या घरांमधून गर्दी केली होती. प्रत्येक घरातून पार्थिवावर फुले उधळण्यात आली. ‘भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे, चंद्रकांत भाकरे अमर रहे’ अशा घोषणा दुमदुमत होत्या. 

यावेळी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी बुलडाणा सुमन चंद्र, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डाॅ. संजय कुटे, दिलीप भुजबळ, वैशाली देवकर, तहसीलदार समाधान राठोड, सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी एस. पी. महेश्वरी, संजय लाटकर, संजय कुमार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पार्थिवाला सीआरपीएफ १७९ बटालियन कडून बंदुकीतून तीन वेळा हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली. चंद्रकांत यांचे भाऊ तुषार व जयंत यांनी चिताग्नी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT