Fund of Rs. 15 crore for Krishi Swavalamban Yojana 
मुख्य बातम्या

कृषी स्वावलंबन योजनेसाठी १५ कोटी रुपयांचा निधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान झाल्याने योजना पुन्हा राबविण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. कोविड काळात या योजनेच्या अंमलबजावणीस शासनाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान झाल्याने योजना पुन्हा राबविण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. कोविड काळात या योजनेच्या अंमलबजावणीस शासनाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद औरंगाबादेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. या योजनेतून सन २०१६ पासून दर वर्षी साधरणत: ४०० ते ६०० अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची निवड करून त्यांना नवीन विहीर पॅकेज, जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज, शेततळे अस्तरीकरण पॅकेज, इतर लाभ पॅकेज यापैकी एका पॅकेजचा लाभ देण्यात येतो.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी या योजनेतंर्गत १५ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यामधून साधारणतः ६०० लाभार्थ्यांची निवड होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. महाडिबीटी पोर्टलवर या योजनेसाठी १४२० अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेस मान्यता मिळाल्यामुळे लवकरच लाभार्थ्यांची निवडीची प्रक्रिया आता पार पडेल. या वर्षी महाडिबीटी प्रणालीवरुन लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी कळविले आहे.

शासनाने दरम्यानच्या कालावधीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी लागू असलेल्या व सारखेच घटक असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती येाजनेस प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रदान केली तथापि या योजनेस मात्र स्थगिती दिली होती. यामुळे यावर्षी ६०० अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यमंत्री ग्रामविकास व महसुल यांच्या जिल्हा परिषद येथे झालेल्या बैठकीत कृषी सभापती तथा उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके व पदाधिकारी यांनी ही बाब निदर्शनास आणून स्थगिती उठविण्याबाबत मंत्री महोदयांना विनंती केली होती.

या विषयावर स्थायी समितीमध्ये चर्चा करून शासनाकडे योजनेची स्थगिती उठवून निधी उपलब्ध करून देणेबाबत सुद्धा स्थायी समितीचे सदस्य व पदाधिकारी यांनी मागणी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

SCROLL FOR NEXT