तीन बियाणे कंपन्यांवर फसवणूकप्रकरणी गुन्हा
तीन बियाणे कंपन्यांवर फसवणूकप्रकरणी गुन्हा 
मुख्य बातम्या

तीन बियाणे कंपन्यांवर फसवणूकप्रकरणी गुन्हा

टीम अॅग्रोवन

अमरावती ः लागवड केलेल्या कपाशीच्या तीन कंपन्यांच्या वाणांवर १०० टक्‍के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी संबंधित कंपन्यांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयात केलेल्या डेरा आंदोलनानंतर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वरुड तालुक्‍यातील वाडेगाव येथील शेतकरी संजय महादेव साबळे यांनी ९ जून २०१८ रोजी शेतीधन कृषी सेवा केंद्रातून राशी ६५९, बायर बायो सायन्स कंपनीचे सुपर्ब खरेदी केले. गौरी कृषी सेवा केंद्रातून बायरचे सुपर्ब तसेच अंकुर कंपनीचे ३०२८ हे वाण खरेदी केले होते. ०.४० तसेच ०.७३ हेक्‍टर क्षेत्रावर याची लागवड करण्यात आली.  दरम्यान बियाणे सदोष असल्याने त्यावर काही महिन्यांतच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. फूल आणि पात्यावर बोंड अळी दिसल्याची तक्रार शेतकऱ्याने पंचायत समितीकडे केली. त्याची दखल घेत वरुड तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी व शेतकरी संजय साबळे यांनी पाहणी केली. प्राथमिक पाहणी अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे देण्यात आला. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीने देखील संबंधित कंपन्यांच्या वाणावर १०० टक्‍के बोंड अळी झाल्याचे निरीक्षण नोंदविले. २४ ऑगस्ट रोजी हा अहवाल सादर करण्यात आला. 

स्वाभिमानीचे आंदोलन आणि गुन्हा याप्रकरणी अंकुर, बायर आणि राशी या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल व्हावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात वरुड तालुका कृषी कार्यालयात डेरा आंदोलन करण्यात आले. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी या आंदोलनासंदर्भाने संपर्क साधण्यात आले. त्यामुळे कृषी विभागात एकच धावपळ झाली. या घडामोडीनंतर रात्री उशिरा अंकुर सीडस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, बायर बायोसायन्स प्रा. लि. माधापूर हैदराबाद, राशी सिडस प्रा. लि. अत्तुर, तामिळनाडू या तीन कंपन्यांविरोधात फसवणूक तसेच बियाणे कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT