Four thousand farmers in Parbhani, Hingoli district are tired of the grammar bill
Four thousand farmers in Parbhani, Hingoli district are tired of the grammar bill 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोली जिल्ह्यात चार हजार शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे चुकारे थकले

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात आजवर ५ हजार ५८७ शेतकऱ्यांना ७८ हजार ३६० क्विंटल हरभऱ्याचे ३८ कोटी २० लाख ६ हजार ७५४ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले. परंतु, अद्याप ४ हजार २३७ शेतकऱ्यांच्या ५३ हजार १२३ क्विंटल हरभऱ्याचे २५ कोटी ८९ लाख ७४ हजार ६२५ रुपयांचे चुकारे थकित आहेत.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत राज्य सहकारी पणन महासंघाच्या १४ केंद्रावर ९ हजार ८२४ शेतकऱ्यांच्या १ लाख ३१ हजार ४८३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. २० हजार  ८७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. 

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या आठ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी ११ हजार ६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पालम वगळता अन्य सात केंद्रांवर विहित मुदतीत ४ हजार २६८ शेतकऱ्यांचा ५१ हजार १५४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. आजवर २ हजार ४५ शेतकऱ्यांना २४ हजार ९९६ क्विंटल हरभऱ्याचे १२ कोटी १८ लाख ५७ हजार ११ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले. 

अद्याप २ हजार २२३ शेतकऱ्यांचे चुकारे थकित आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या सात केंद्रांवर ९ हजार ८१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्यांपैकी ५ हजार ५५६ शेतकऱ्यांच्या ८० हजार ३२८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. आजवर एकूण ३ हजार ५४२ शेतकऱ्यांना ५३  हजार ३६४ क्विंटल हरभऱ्याचे २६ कोटी १ लाख ४९ हजार ७४३ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले. अद्याप २ हजार १४ शेतकऱ्यांचे थकित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT