माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन 
मुख्य बातम्या

माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

टीम अॅग्रोवन

नगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा राज्य मंत्री अनिल राठोड (वय ७०) यांचे आज पहाटे साडेपाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.  अहमदनगर शहरातील हिंदुत्वाचा बुलंद आवाज अशी ओळख असलेले माजी आमदार अनिल राठोड यांनी नगर शहराचे आमदार म्हणून पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व केले. युती सरकारच्या काळात ते काही काळ राज्यमंत्री होते. सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणूनही अनिल राठोड यांची ओळख होती. सामाजिक कार्यासाठी त्यांनी काही संस्थांची स्थापना केली. रस्त्यावरील सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मंत्री अशी ओळख निर्माण झालेले राठोड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यात शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT