चारा छावण्यांना १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
चारा छावण्यांना १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ 
मुख्य बातम्या

चारा छावण्यांना १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
    मुंबई : राज्यात मोसमी पाऊस उशिराने सुरु झाल्याने चारा उपलब्ध होण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन राज्याच्या दुष्काळी भागात सुरु असलेल्या चारा छावण्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या छावण्या येत्या १ ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.      खरीप २०१८ मध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात, याव्यतिरिक्त २६८ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ तसेच त्याव्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या दुष्काळी भागातील जनावरांसाठी आवश्यक चारा आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरु केल्या आहेत. याआधीच्या निर्णयानुसार चारा छावण्या ३० जूनपर्यंत सुरु ठेवाव्यात असे निर्देश देण्यात आले होते. तसेच ही मुदत संपण्यापूर्वी १५ दिवस आधी खरीपात झालेला पाऊस आणि चाऱ्याची उपलब्धता विचारात घेऊन छावण्या सुरु ठेवण्याबाबतचा आढावा घेण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, राज्यात यंदा पूर्व मोसमी पावसाचे आगमन विलंबाने झाले असल्याने आणि त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्या पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चारा छावण्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात १,५८३ चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये लहान व मोठी अशी एकूण सुमारे साडेदहा लाखाहून अधिक जनावरे आहेत. छावण्यांमधील मोठ्या जनावरांना प्रति दिन १०० रुपये आणि लहान जनावरांना ५० रुपये अनुदान दिले जाते. चारा छावण्यांना आतापर्यंत ३९२ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : हळदीच्या भावातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद तसेच आल्याचे दर ?

Jowar Registration : ज्वारी विक्रीसाठी शासकीय केंद्रात अल्प नोंदणी

Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT