संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

साताऱ्यातील चारा छावण्यांच्या तपासणीसाठी पाच पथके

टीम अॅग्रोवन

सातारा   : दुष्काळी स्थितीशी सामना करण्यासाठी माण तालुक्यात १८ चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरीय पाच पथके तयार केली असून, त्यांचा त्यावर ‘वॉच’ राहणार आहे. 

जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर बनली आहे. तब्बल २०२ टॅंकरद्वारे नागरिकांना, पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रतिदिन चार लिटर, लहान जनावरांसाठी प्रतिदिन १५ लिटर तर मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन ३५ ते ४० लिटर पाणी प्रशासनाकडून टॅंकरद्वारे दिले जात आहे. गत पावसाळ्यात दुष्काळी माण, खटाव, उत्तर कोरेगाव, खंडाळा, फलटण तालुक्‍यांत कमी पाऊस झाला. परिणामी, चारा उत्पादन घटले आहे. माण पाठोपाठ खटाव तालुक्‍यातही चाराटंचाई भासू लागली आहे.

माण तालुक्‍यात तीव्र चारा व पाणीटंचाई असल्याने चारा छावण्या सुरू करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. माणमध्ये सध्या १८ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. २०१२ मध्ये पडलेल्या दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू होत्या. त्या वेळी अनेक चारा छावणीचालकांनी भ्रष्टाचार केल्याचे समोर आले होते. या वेळी असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी चारा छावणी तपासणी पथके तयार केली आहेत. चारा छावणीचालक नियम, अटींचे पालन करतात का? नोंदवही यासह विविध तांत्रिक, आर्थिक बाबींची तपासणी हे पथक १५ दिवसांतून एकदा करतील. 

...येथे आहेत छावण्या  भालवडी, आंधळी, जाधववाडी, मोगराळे, बिजवडी, वडगाव, माळवाडी (म्हसवड), भाटकी, अनभुलेवाडी, शेणवडी, सासवड, जांभुळणी, पांगरी (बिरोबानगर), दानवलेवाडी, राजवडी, बोडके (बोराटेवाडी), येळेवाडी, पर्यंती येथे सध्या छावण्या सुरू आहेत.    असे असेल तपासणी पथक चारा छावणी तपासणी पथकात अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, कृषी विकास अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच तालुका तपासणी पथकात गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, कृषी अधिकारी, संबंधित ग्रामसेवकांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT