अंजिराच्या झाडांना फुटवे आले नाही
अंजिराच्या झाडांना फुटवे आले नाही 
मुख्य बातम्या

अंजिराच्या झाडांना फुटवे फुटलेच नाहीत

सकाळ वृत्तसेवा

खेड-शिवापूर, जि. पुणे : बदलत्या हवामानाचा फटका या वर्षी गोगलवाडी (ता. हवेली) आणि वेळू (ता. भोर) भागातील अंजिराच्या बागांना बसला आहे. या पट्ट्यातील सुमारे ६० टक्के बागांतील झाडांना फुटवे फुटलेले नसून मोठ्या प्रमाणात पानगळती झाली आहे. त्याचा परिणाम या पट्ट्यातील मीठा अंजिराच्या उत्पादनावर होणार आहे, त्यामुळे अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. गोगलवाडी आणि वेळू या गावात अंजिराचा मीठा बहर धरला जातो. या भागातील अंजिराचे उत्पादन साधारणतः जानेवारी ते जून या दरम्यान मिळते. मात्र, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात असलेले ढगाळ वातावरण, मोठ्या प्रमाणात पडलेले दव आणि हवामानात सारखा होत असलेला बदल याचा अंजिराच्या बागांना फटका बसला आहे.  बदलत्या हवामानामुळे अंजिराच्या झाडांना चांगला फुटवा फुटलेला नाही. तसेच सुमारे ६० टक्के बागांतील झाडांची पानगळती झाली आहे. विशेषतः अंजिराच्या जुन्या बागांची पानगळती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्याचा परिणाम अंजिराच्या उत्पादनावर होण्याची शक्‍यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर बागा सोडून दिल्या आहेत. अनेकांनी केलेला खर्चही भरून निघण्याची शक्‍यता नाही. हवामानबदलाचा मोठा परिणाम अंजिराच्या पिकांवर झाला आहे. परिसरातील काही मोजक्‍याच बागा चांगल्या स्थितीत असून ६० टक्के अंजिराच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या वर्षी अंजिराच्या पिकावर अवलंबून असलेले आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे शेतकरी गणेश गोगावले, नितीन गोगावले यांनी सांगितले.  पाणी आहे; पण हवामानाची साथ नाही दरवर्षी अंजिराच्या पिकाला पाण्याचा तुटवडा भासतो. या वर्षी मात्र परतीचा पाऊस दमदार झाल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अंजिराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, या वर्षी हवामानाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT