grapes spraying
grapes spraying  
मुख्य बातम्या

ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत 

टीम अॅग्रोवन

सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे भुरी, द्राक्षकूज आणि मणीगळ होण्याची शक्‍यता असल्याने उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान वेगाने बदलत आहे. बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षपिकाला बसण्याची शक्यता आहे. फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या बागांमध्ये द्राक्षकूज, मणीगळ होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय वातावरण निवळल्यानंतर द्राक्षबागेमध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने बागायतदार धास्तावले आहेत. आधीच यावर्षी द्राक्ष उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे आणि त्यातच बदलत्या हवामानाचा आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.  सध्या परिपक्व झालेल्या द्राक्षबागांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो. यावर्षी अति पावसामुळे आणि बागेत पाणी साचल्याने द्राक्षाचे घड जिरल्याची समस्या दिसून आली. या संकटातून शेतकरी सावरतोय तोपर्यंत ढगाळ हवामानामुळे संकटात आणखी वाढ झाली आहे.  प्रतिक्रिया ढगाळ वातावरणामुळे द्राक्षकूज, मणीगळ ही समस्या दिसणार आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.  - चंद्रकांत लांडगे, विभागीय अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, सांगली विभाग .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT