शेतकरी करणार नाना पटोले यांचा सत्कार
शेतकरी करणार नाना पटोले यांचा सत्कार 
मुख्य बातम्या

शेतकरी करणार नाना पटोले यांचा सत्कार

टीम अॅग्रोवन

अकोला  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न तसेच ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा मंगळवारी (ता. २८) शेतकरी तसेच इतर संघटना जाहीर सत्कार करणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा काँग्रेस नेते अशोक अमानकर यांनी बुधवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच जिल्ह्यात येणार आहे. हे निमित्त साधून नाना पटोले मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता. २८) त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन शहरातील कौलखेड रिंग रोडवरील जानोरकर मंगल कार्यालयात होत आहे. श्री. पटोले यांचा सत्कार गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार उद्धवराव गाडेकर यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज राहणार आहेत. या सत्कार सोहळ्यात सर्व ओबीसी संघटना, सेंद्रिय शेतमाल उत्पादक मंडळ, पारस प्रकल्पग्रस्त शेतकरी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी होणार असल्याचे श्री. अमानकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला मुरलीधर राऊत, श्रीकृष्ण इंगळे, मधुकर सरप, तुळशीदास बोदडे, राजदत्त मानकर आदींची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

Maharashtra Rain : विदर्भात गारपीटीचा अंदाज; राज्यातील विविध भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Sugar Price Hike : ऐन निवडणुकीत साखरेच्या दरात तेजी, क्विंटलचा दर वाढल्याचा कोणाला फायदा?

SCROLL FOR NEXT