irrigation  
मुख्य बातम्या

तोडली 'लाईट'; पिकांना पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड 

थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक वसुली मोहीम हातात घेत वीजजोडण्या तोडण्यात येत आहेत. याचा फटका वीजबिल थकीत नसलेल्यांनाही बसत असून, पिके वाचविण्याची सर्वांची धडपड सुरू आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक वसुली मोहीम हातात घेत वीजजोडण्या तोडण्यात येत आहेत. याचा फटका वीजबिल थकीत नसलेल्यांनाही बसत असून, पिके वाचविण्याची सर्वांची धडपड सुरू आहे. विजेअभावी कृषिपंप बंद असल्याने पर्यायी साधनांचा वापर केला जात आहे. 

मुंबईतील अधिवेशन संपताच वीजबिल वसुलीची धडक मोहीम हातात घेण्यात आली. महावितरणकडून शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. एका रोहित्रावर असलेल्या एकूण शेतकऱ्यांमध्ये सर्व जण थकबाकीदार नसले तरी संपूर्ण रोहित्राची वीज खंडित केली जात आहे. यामुळे ज्यांच्याकडे थकीत रक्कम नाही त्यांनाही या धोरणाचा फटका बसू लागला आहे. 

शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी आणि त्यांना हे बिल भरताना सवलत मिळावी याकरिता महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी कृषी वीजबिल सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाचा फटका बसत आहे. सध्या शेतशिवारात रब्बीतील काही व उन्हाळी पिके उभी आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याची गरजही वाढत आहे. अशातच वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा फटका बसू लागला. वीज तोडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याने स्थानिक यंत्रणाही हतबल झालेली आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.  प्रतिक्रिया  महावितरणने गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव तालुक्यातील शेती पंपाचा वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना भुईमूग, तीळ व इतर पिकांना पाणी कसे द्यावे, हा पेच निर्माण झाला. आमच्याकडे व्यवस्था असल्याने ट्रॅक्टरच्या मदतीने पाणी देत आहे. पण डिझेलचा खर्च परवडत नाही. आम्ही शेती पंपाचे वीजबिल भरलेले आहे. तरी इतरांनी पैसे न भरल्याने व ते जोपर्यंत भरणार नाहीत, तोवर वीजपुरवठा सुरू करणार नसल्याची भूमिका घेतल्याने आम्हाला अतोनात त्रास झेलावा लागत आहे.  - विनोद भोयर, शेतकरी, सुदी, ता. मालेगाव, जि. वाशीम   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT