watermelon and  muskmelon
watermelon and muskmelon 
मुख्य बातम्या

सोलापूर : द्राक्ष, डाळिंब कवडीमोल, कलिंगड, खरबूज थेट जनावरांना 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः कोरोनामुळे सोलापूरसह नजीकच्या सर्व बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील फळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मार्चपर्यंत द्राक्ष, डाळिंबाला चांगला दर मिळत होता. पण गेल्या पंधरवड्यात द्राक्षाला १० ते १२ रुपये आणि डाळिंबाला १० ते २० रुपये किलो इतका दर खाली आला आहे. दुसरीकडे कलिंगड आणि खरबूज थेट जनावरांना खाऊ घातली जात आहेत.  सोलापूर जिल्ह्यात द्राक्षाचे जवळपास २५ हजाराहून अधिक एकर क्षेत्र आहे. तर डाळिंबाचे ५० हजाराहून अधिक एकर क्षेत्र आहे. डाळिंबाचा बहार बहुतेक भागात अंतिम टप्प्यात आहे. पण द्राक्ष उत्पाकांसह कलिंगड आणि खरबूज उत्पादकांची मात्र ऐन हंगामातच आर्थिक कोंडी झाली आहे. बार्शी, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या पट्ट्यात द्राक्ष, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस भागात डाळिंब आणि मोहोळच्या पापरी, खंडाळी, पेनूरसह माढ्यातील कुर्डुवाडी, मोडनिंब या भागात कलिंगड आणि खरबूजा मोठा टप्पा आहे.  उत्पादक भागातील वाहतूक पूर्णपणे बंद आहेच. पण मूळात बाजार समित्या बंद असल्याने त्याची विक्री करायची कुठे, हा प्रश्न आहे. द्राक्षाला प्रतिकिलोला १० ते १२ रुपये, डाळिंबाला १० ते २० रुपये किरकोळ विक्रीचे दर आहेत. तर कलिंगड आणि खरबूजाला ३ ते ४ रुपये दर मिळत आहे. कलिंगड आणि खरबूज उत्पादकांनी विक्रीपेक्षा जनावरांना खाऊ घालणे अधिक पसंत केले आहे. कारण, या भागात एकेक शेतकऱयांकडे ५ ते २० एकरपर्यंत या फळांचे क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडील फळाची किरकोळ विक्रीही होऊ शकत नाही, सोलापूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज या महत्वाच्या बाजारपेठा जिल्ह्यात आहेत. पण मुंबई आणि पुणेही सोलापूरसाठी महत्वाची बाजारपेठ आहे. पण त्याही बंद असल्याने अडचण झाली आहे. मुंबई आता सुरु झाली असली, तरी वाहनाची अडचण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर फळ उत्पादकांची चांगलीच गोची होऊन बसली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT