भात लागवडीवर मार्गदर्शन
भात लागवडीवर मार्गदर्शन 
मुख्य बातम्या

यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा मावळातील शेतकऱ्यांचा निर्णय

टीम अॅग्रोवन

वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केली होती. यामुळे वेळ व श्रमात मोठी बचत झाली होती. भात उत्पादनातही वाढ झाली होती. त्यामुळे यंदाही यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याचा निर्णय मावळातील भात उत्पादकांनी घेतला आहे. कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून यंदा भात लागवडीसाठी आम्ही तीन शेतकऱ्यांनी यंत्राची खरेदी केल्याची माहिती भात उत्पादक शेतकरी पुंडलिक जोरी यांनी दिली.

कृषी विभाग व ‘आत्मा’अंतर्गत कान्हेफाटा (ता. मावळ) येथील सेवाधाम ट्रस्ट येथे यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, तालुका कृषी अधिकारी विनायक कोंथिबिरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, कृषी अधिकारी उत्तम भांड, घनशाम अभंग, विकास धेंडे, नवीनचंद्र बोराडे, प्रगतशील शेतकरी बजाबा मालपोटे, काळूराम मालपोटे यांच्यासह परिसरातील भात उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

श्री. जोरी म्हणाले, की मी गेल्या वर्षी भात रोपवाटिका तयार केली होती. मात्र, एकाचवेळी लागवडी सुरू झाल्याने मजुरांची अडचण भासण्यास सुरवात झाली. त्यामुळे आम्ही यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला मनात शंका होत्या. प्रत्यक्षात लागवड करण्यास सुरवात केल्यानंतर यशस्वी झाल्याचे लक्षात आल्याने यंदाही भात लागवडीचा मी निर्णय घेतला आहे.

बजाबा मालपोटे म्हणाले, की आम्ही गटातील शेतकऱ्यांनी यंत्रामुळे लागवड केल्यामुळे खर्च कमी होऊन वेळेची बचत झाली. यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केल्यामुळे भाताचे फुटवे चांगले मिळाले. साधारणपणे एकरी चाळीस क्विंटल भात उत्पादन मिळाले. यशस्वी उत्पादन मिळाल्याचे पाहिल्यानंतर परिसरातील  शेतकऱ्यांनी माझ्याकडे यांत्रिकीकरणाद्वारे यंदा भात लागवड करण्याची विचारणा केली आहे. यंदा आम्ही ‘आत्मा’च्या माध्यमातून आंदरमावळ परिसरात सुमारे शंभर एकरांवर भात लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी आम्ही २७ एकरांवर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केली होती.

अनिल देशमुख म्हणाले, की गेल्या वर्षी ‘आत्मा’च्या माध्यमातून शंभर एकरांवर भात लागवड करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या यांत्रिकीकरणाच्या योजनेतून मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्‍यात सात भात लागवड यंत्रे दिली आहे. यात मावळात तीन यंत्रे दिली आहे. यंदा यंत्राद्वारे भात लागवड करण्यासाठी भात उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात संमती दर्शविल्यास त्यांना ‘आत्मा’अंतर्गत शेतावर प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी यंत्रे घेतली आहेत, त्यांनी ही यंत्रे शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

या वेळी विनायक कोंथिबिरे यांनी प्रास्तविक केले. राहुल घोगरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT