शेतकऱ्यांनी बोंड अळीबाबत खबरदारी घ्यावी
शेतकऱ्यांनी बोंड अळीबाबत खबरदारी घ्यावी 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी बोंड अळीबाबत खबरदारी घ्यावी

टीम अॅग्रोवन

हिंगोलीः गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकरी अनिल भंडारी यांनी केले. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी मास ट्रॅपिंगसाठी निवडलेल्या बोराळा (ता. वसमत) येथील कपाशीच्या पिकाची पाहणी श्री. भंडारी यांनी केली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी गजानंद पवार आदीसह शेतकरी, कृषी सहायक उपस्थित होते.

बोंड अळीच्या नियंत्रणासाठी बोराळा शिवारातील १०० हेक्टरवरील कपाशीच्या पिकांमध्ये कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. त्यामुळे किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी मदत होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी क्राॅपसॅपअंतर्गत कृषी सहायकामार्फत आॅनलाइन आॅब्झरवेशनची प्रत्यक्ष पडताळणी केली. शेतकऱ्यांची संवाद साधला. श्री. लोखंडे यांनी बोंड अळी व्यवस्थापनाबाबतच्या उपाय योजनांची माहिती दिली.

वाखारी (ता. वसमत) येथे जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत झालेल्या नाला खोलीकरणामध्ये जलपूजन करण्यात आले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. उप्पलवाड, श्री. घोडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT