Farmers should be ready without spending: Vice Chancellor Dr. Dhavan
Farmers should be ready without spending: Vice Chancellor Dr. Dhavan 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी न खचता सज्ज राहावे ः कुलगुरू डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘मराठवाड्यातील शेती पुढे अनेक समस्‍या आहेत. शेतकऱ्यांच्या कृषी विषयक समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ नेहमीच तत्पर आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, विद्यापीठ सदैव तुमच्या पाठीशी आहे’’, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व रिलायन्स फाउंडेशनतर्फे मंगळवारी (ता. २७) आयोजित ध्वनी परिषदेत ते बोलत होते. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. यु. एन. आळसे, शास्‍त्रज्ञ डॉ. एस. जे शिंदे, डॉ. बी. एस. कलालबंडी, प्रा. डी. डी. पटाईत आदींनी सहभाग घेतला. 

डॉ. ढवण म्हणाले, ‘‘खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कृषी विषयक माहिती देण्यासाठी ‘ऑडिओ कॉन्फरन्स’ उपक्रम उपयुक्त ठरत आहे.’’ 

डॉ. देवसरकर म्हणाले , ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य सांभाळणे ही काळाची गरज आहे. मृद व पाणी नमुने तपासणी करुन घ्यावेत. माती परिक्षणामुळे जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य, तसेच पिकाला आवश्यक अन्नद्रव्य मात्रा या आधारे आवश्यक खत मात्रांचा अवलंब करणे शक्य होते.’’ 

डॉ. आळसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कोरोना विषाणू परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना शारीरिक अंतर राखणे गरजेचे असल्‍याचे पटाईत यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी घरातच बसून फोनद्वारे फळबाग व्यवस्थापन, खरीप पूर्व नियोजन, जमीन मशागत, हुमणी नियंत्रणाचे उपाय यावर प्रश्न विचारले. जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे, कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी पुढाकार घेतला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

SCROLL FOR NEXT