fruit cake  
मुख्य बातम्या

मालेगावच्या शेतकऱ्यांचा कलात्मक फ्रूट केक 

अर्धापूर तालुक्यातील मालेगावच्या विठोबा नैसर्गिक फळे व भाजीपाला गटाच्या सदस्यांनी केकऐवजी फळे कापून वाढदिवस साजरा करण्याची चळवळ उभी केली आहे.

टीम अॅग्रोवन

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील मालेगावच्या विठोबा नैसर्गिक फळे व भाजीपाला गटाच्या सदस्यांनी केकऐवजी फळे कापून वाढदिवस साजरा करण्याची चळवळ उभी केली आहे. याच्याही पुढे जाऊन या गटाच्या सदस्यांनी फळांचा कलात्मक फ्रूट केक बनवून या व्यवसायात संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  विठोबा परिवारातील सविता एकनाथ पावडे या महिलेचा केकऐवजी फळांचा वापर करून वाढदिवस साजरा केला होता. अशा प्रकारच्या वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीला राज्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी केकऐवजी फळांचा वापर वाढला. कोरोना काळात फास्टफूडला पर्याय शोधणाऱ्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी फ्रूट केकचा पौष्टिक आणि रसरशीत मार्ग सापडला. ग्रामीण, शहरी भागातून फळांची आकर्षक मांडणी करणारे केक लोकप्रिय ठरू लागले. समाजमाध्यमांवर फ्रूट केकच्या रेसिपीची चर्चा लाइक्सचा पाऊस पाडणारी ठरली. या माध्यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी नाते जोडून उद्योग-व्यवसायाचे स्वप्न पाहणाऱ्‍या तरुण होतकरू उद्योजकांसमोर एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. 

मालेगावच्या विठोबा नैसर्गिक फळे व भाजीपाला गटाच्या सदस्यांनी तर कलात्मक फ्रूट केक बनविण्याचे कसब मिळविले आहे. येथील संगम देलमडे, उमाकांत राजाभाऊ राजेवार व ईश्‍वर पाटील यांनी अतिशय कलात्मक फ्रूट केक तयार केले आहेत. या भागात शेतकऱ्यांच्या फळांना अधिकचा दर मिळत असल्याचे संदीप डाकुलगे यांनी सांगितले.  फ्रूट केक शॉपी निर्माण होतील  फ्रूट केक हा व्यवसाय भविष्यात शेतीला चालना देणारा ठरेल. मालेगावच्या शेतकऱ्यांनी बनविलेले कलात्मक केक ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. यासोबतच आरोग्याच्या दृष्टीचे महत्त्वाचे असल्याने अनेकांच्या ते पसंतीस पडत आहेत. यामुळे भविष्यात फ्रूट केक शॉपीचा नवा संकल्प पुढे येईल, असे गटाचे सदस्य सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: गाळप हंगाम लवकर सुरु केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींची आंदोलनाची घोषणा, महाराष्ट्र- कर्नाटकातील संघटना एकवटल्या

Soybean Rate: देशातील उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता ?

Sugarcane Harvesting Workers: ऊसतोड मजुरांना मिळणार मूलभूत सुविधा; साखर कारखान्यांना सरकारचे कडक निर्देश

Silk Farming : रेशीम शेतीत उद्योजकतेच्या संधी

Farmers Demand: उसाला प्रति टन सहा हजार रुपये दराची मागणी

SCROLL FOR NEXT