पूर्वहंगामी कापूस पीक मोडण्यास सुरुवात; गुलाबी बोंड अळीचा कहर 
मुख्य बातम्या

पूर्वहंगामी कापूस पीक मोडण्यास सुरुवात; गुलाबी बोंड अळीचा कहर

खानदेशात कापूस दर तेजीत आहेत. पण दुसरीकडे कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने कहर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापूस पीक मोडून त्यात रब्बी हंगाम साधण्याचा प्रयत्न केला आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात कापूस दर तेजीत आहेत. पण दुसरीकडे कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने कहर केला आहे. कुठलेही खोडवा किंवा फरदड उत्पादन घेणे अशक्य आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापूस पीक मोडून त्यात रब्बी हंगाम साधण्याचा प्रयत्न केला आहे. 

कापूस लागवडीत जळगाव जिल्हा राज्यात गेले चार वर्षे क्रमांक एक राहिला आहे. या हंगामात पाच लाख १८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड जळगावात झाली होती. तर खानदेशात मिळून सुमारे पावणेनऊ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यात कृत्रीम जलसाठाधारकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केली होती. तसेच अनेकांनी एचटीबीटी कापूस वाणांची देखील लागवड मे महिन्यात केली होती. 

खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली होती. पण यंदा अतिपावसाने पिकाची मोठी हानी झाली आहे. एकरी अडीच क्विंटलदेखील उत्पादन पूर्वहंगामी कापूस पिकात आलेले नाही. यात मजुरीचा खर्च दुप्पट झाला. नऊ रुपये प्रतिकिलो व रोजंदारीने २०० रुपये रोज एवढी मजुरी शेतकऱ्यांना द्यावी लागत होती. कापसाचे उत्पादन कमी असल्याने दरवाढ दिसत आहे. पण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला व उत्पादन घटले आहे. यातच या पिकात गेल्या महिन्यातच गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. बोंडे उमलत नाहीत. कैऱ्या लगडत आहेत, पण काहीएक उपयोग नाही. कारण त्यांचे उत्पादनच येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी हे पीक मोडून त्यात हरभरा, गहू, मका, कांदा आदी पिके घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. 

या पिकात अनेक भागांत पशुधन चराईला सोडले जात आहे. काही शेतकरी उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरवत आहेत. शेताची पूर्वमशागत करण्याची लगबग सुरू आहे. गेल्या आठ ते १० दिवसांत खानदेशात ७० टक्के पूर्वहंगामी कापसाचे पीक मोडण्यात आल्याची माहिती आहे. अर्थातच किमान ८० हजार हेक्टरवरील पीक मोडून त्याखालील क्षेत्र रिकामे झाले आहे. याखालील रब्बी हंगामातील पिकांची पुढील आठवड्यात पेरणी होईल, असे दिसत आहे. 

प्रतिक्रिया... मी सुमारे साडेतीन एकरात पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड केली होती. कापसाखालील पूर्ण क्षेत्र मोडून रिकामे केले आहे. उत्पादन एकरी अडीच क्विंटल एवढेच आले आहे. गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव आहे. ती अनेक फवारण्या घेऊनही आटोक्यातच येणार नाही. शिवाय मजुरीचा खर्च वाढला आहे. यामुळे पीक मोडून त्यात रब्बी हंगाम घेईल.  - बळिराम चौधरी, शेतकरी, वनोली (जि. जळगाव) 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT