शेतकऱ्याने मागितली गांजा लागवडीसाठी परवानगी ! 
मुख्य बातम्या

शेतकऱ्याने मागितली गांजा लागवडीसाठी परवानगी !

शेतीमालाला भाव मिळत नसल्याने व्यथितशेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्याला दोन एकरांवर गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः शेतीमालाला भाव मिळत नसल्याने व्यथित झालेल्या शिरापूर (ता. मोहोळ) येथील अनिल पाटील या शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्याला दोन एकरांवर गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.  मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे पाटील यांची स्वतःच्या मालकीची जमीन गट क्रमांक १८१-४ आहे. या शेतीत गांजा लागवडीस परवानगी मिळावी, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतच्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे, की मी एक शेतकरी असून, कोणतेही पीक केले तरी त्याला शासनाचा हमीभाव नसल्याने शेती तोट्यात करावी लागत आहे. कवडीमोल दराने शेतीमाल विकावा लागतो आहे. सध्या शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीचा खर्चही निघत नाही, कारखान्याला ऊस घातला, तर त्याचे बिलही वेळेवर मिळत नाही. सध्या गांजाला चांगला भाव आहे. त्यामुळे गांजाची शेती करण्यासाठी मला १५ सप्टेंबरपर्यंत लेखी परवानगी द्यावी, या मुदतीपर्यंत आपण ही परवानगी न दिल्यास १६ सप्टेंबरपासून मला परवानगी मिळाली, असे गृहीत धरून मी लागवड सुरू करणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास आपले प्रशासन जबाबदार राहील, असेही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मात्र हे निवेदन पोलिसांकडे पाठवून यासंबंधी योग्य ती चौकशी करण्याची सूचना केल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IFFCO Nano NPK Fertilisers: 'इफको'च्या लिक्विड, दाणेदार नॅनो एनपीके खतांना केंद्राची मंजुरी, पीक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची

Water Storage: खानदेशात जलसाठा ६२ टक्क्यांवर

Shade Net House: शेडनेट हाउस उभारणीसाठी लागणारे कव्हरिंग साहित्य

Farmer Crisis: एकोणीस मार्चला का करायचा उपवास?

PMGSY Road Issue: सहा महिन्यांत ४६ कोटींचा रस्ता उखडला

SCROLL FOR NEXT