‘लॉकडाउन’मध्ये कमाल... शेतकऱ्याच्या दोन्ही मुली शिकल्या ट्रॅक्टर चालवायला !  
मुख्य बातम्या

‘लॉकडाउन’मध्ये कमाल... शेतकऱ्याच्या दोन्ही मुली शिकल्या ट्रॅक्टर चालवायला ! 

एका शेतकऱ्याच्या दोन मुलींनी लॉकडाउनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्टर चालविण्याचे कौशल्य प्राप्त केलं. आता, तर त्या घरच्या शेती कामात आईवडिलांना मदत करत आहेत.

संदीप रायपूरे 

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : लॉकडाउन न सारच थांबल...लोकांना आपल्या घरी बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही. या काळात काहींनी पुस्तकांचा आधार घेतला, तर काहींनी इतर छंद... एका शेतकऱ्याच्या दोन मुलींनी लॉकडाउनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्टर चालविण्याचे कौशल्य प्राप्त केलं. आता, तर त्या घरच्या शेती कामात आईवडिलांना मदत करत आहेत. 

कोरोनामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात २१ दिवसाचा लॉकडाउन सध्या आहे. लोकांना आपल्या घरी राहावे लागत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील खराळपेठ येथील विनोद दुर्गे हे शेतकरी आहेत. त्यांना दोन मुली. घराला लागूनच अडीच एकर शेती आहे. लॉकडाउनमुळे सर्व कामे थांबलेले असताना, अशात काय करावे म्हणून दुर्गे यांनी आपल्या दोन्ही मुलींना ट्रॅक्टर शिकविण्याचा निर्णय घेतला. मुलींही अतिशय उत्साहाने ट्रॅक्टर शिकण्यास तयार झाल्या. प्रारंभी मोठी मुलगी प्रेरणा ट्रॅक्टर चालवायला शिकली. अन् यांनंतर तिने लहान बहिणीलाही ट्रॅक्टर शिकविला. या दोन्ही बहिणी आता ट्रॅक्टर चालविण्यात तरबेज झाल्या आहेत. प्रेरणा अकरावीत तर अर्पणा दहावीत शिकते. अभ्यासातही त्या हुशार आहेत, अन् कणखर देखील आहेत. पण आपल्या अंगी कौशल्य असावेत व त्याचा आपल्या कुटुंबियांना फायदा व्हावा या हेतूने आपण ट्रॅक्टर शिकण्याचा निर्णय घेतल्याचे प्रेरणाने सांगितले. 

विनोद दुर्गे, त्यांची पत्नी दोघेही शेतात मेहनत घेतात, त्यांच दुसरं शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. घराला लागून असलेल्या अडीच एकर शेती व गावापासून दूर असलेल्या दोन एकर शेतात कामाच नियोजन करताना आईवडिलांना होणारा त्रास आम्ही दोघी बहिणी अगदी जवळून बघितला आहे. आता आमच्या ट्रॅक्टर शिकण्यामुळे त्यांना होणारा त्रास बराचसा कमी होईल असे या दोघींनी सांगितले. सध्या त्या कपाशीचे फणकट काढण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करू लागल्या आहेत. 

प्रतिक्रिया.. लॉकडाउन मुळे आम्ही घरी राहून कंटाळा आला. बाबा सहज म्हणाले ‘बेटा ट्रॅक्टर चालवायला शिकणार का?’ मग मी तात्काळ तयार झाली. मी ट्रॅक्टर चालविणे शिकल्यानंतर माझ्या लहान बहिणीला देखील शिकविले आहे. आम्ही दोघी बहिणी मिळून आता शेतातील काम करून आईवडिलांना मदत करीत आहोत.  - प्रेरणा विनोद दुर्गे, शेतकरी कन्या, खराळपेठ   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT