Farmers Association did Holi of wrong electricity bills
Farmers Association did Holi of wrong electricity bills 
मुख्य बातम्या

शेतकरी संघटनेने केली  चुकीच्या वीजबिलांची होळी 

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कृषिपंपांच्या जोडण्या तोडण्याचा सपाटा लावला आहे. परंतु शेतकऱ्यांना दिलेली बिले सदोष असून, जोपर्यंत ही बिले दुरुस्त होत नाही, तोपर्यंत एकाही कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये; अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा देत शेतकरी संघटनेने दिला. चुकीच्या वीज बिलांची महावितरण कार्यालयासमोर प्रतिकात्मक होळी केली. धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले.  येथील चिखली मार्गावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर शेतकरी संघटनेने सकाळपासून धरणे आंदोलन केले. दुपारनंतर शेतकरी संघटनेचे राज्य नेते नामदेवराव जाधव यांच्या नेतृत्वात वीजबिलांची होळी करण्यात आली. चुकीची वीजबिले खपवून घेणार नाही, अशी भूमिका या वेळी जाधव यांनी मांडली. महावितरण कृषिपंपांच्या थकीत बिलापोटी वीजपुरवठा कापण्यासाठी रोहित्रे बंद करण्याची कार्यवाही करीत आहे. शेतकऱ्यांना मे महिन्यात देण्यात आलेले कृषिपंपांचे वीजबिल हे नियमबाहाय व तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. कृषिपंपांचे वीजबिल मीटर रीडिंग न घेता सरासरीने दिले असून, ते वीज नियामक मंडळाच्या कायद्यानुसार चुकीचे आहे. ज्या शेतकऱ्यांना अश्‍वशक्तीप्रमाणे वीजबिल दिले जाते त्यांनी चुकीचे दिले. बिलात पूर्ण वर्षभर वीज वापर केला, असे गृहीत धरून आकारणी केली आहे. शेतकरी पावसाळ्याचे चार महिने कृषिपंपांचा वापर करीत नाहीत. उन्हाळ्यात ३ महिने शेतात विहिरींना पाणी राहत नसल्याने ओलितासाठी वापर करीत नाही. त्यामुळे वापर न केलेल्या विजेच्या रक्कमेची शेतकऱ्यांकडून मागणी करणे पूर्णतः बेकायदा आहे. अश्‍वशक्तीप्रमाणे वीजबिल आकारणी २४ तास वीजपुरवठा केला, असे गृहीत धरून केलेली. वास्तविक कृषिपंपांना वीजपुरवठा दिवसातून ८ तास होत आहे. त्यामुळे संपूर्ण बिल बेकायदा आहे, असाही संघटनेने दावा केला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT